उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताह संपन्न

माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालयामध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी,खो-खो,गोळाफेक,लांबउडी, १०० मी धावणे इत्यादी मैदानी स्पर्धांमध्ये पाचवी ते दहावीच्या सर्व वर्गांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उपळाई बुद्रुक च्या सरपंच सुमनताई माळी मॅडम,स्कूल कमिटीचे सदस्य भारत (आप्पा) घाडगे, केंद्रप्रमुख दिगंबर काळे, स्टेट बँक ऑफ इंडिया माढा शाखेचे शाखा प्रबंधक प्रसाद कदम साहेब,सेवानिवृत्त मेजर बाळासाहेब नागटिळक, सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र माळी सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा आणि विभागीय स्तरावरील खेळाडू व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक शब्बीर तांबोळी सर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ देशमुख, विनोद वाकडे, मनोजकुमार शेटे, दैनिक सकाळचे पत्रकार गणेश गुंड, नागेश बोबे सर, मकरंद रिकिबे सर, अंकुश घोडके सर, महेश वेळापुरे सर, अविनाश नारनाळे सर, बप्पासाहेब यादव सर, केशव गायकवाड सर,

हेही वाचा – जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण होणार… टेंडर प्रक्रिया सुरू; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ.बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन 101 देशी वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेतली वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी

सुमित काटे सर, शरद त्रिंबके सर शिल्पा खताळ मॅडम,सुनिता बिडवे मॅडम, शबनम आतार मॅडम,अश्विनी नाईकवाडे मॅडम,ऐश्वर्या फडतरे,कोमल गाडे आदी उपस्थित होते.
यावेळेस उपस्थित क्रीडाप्रेमी मान्यवरांनी विद्यालयातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून १०,००० रुपये किट साठी उपलब्ध करून दिले.

karmalamadhanews24: