पाण्याच्या दुर्भिक्षामुळे करमाळा तालुक्यात ऊस लागवडीवर परिणाम
केत्तूर ( अभय माने) दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे तर उजनी पाणलोट क्षेत्रात पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. परिसरात एक दोन अवकाळी पाऊस व वादळी वारे झाले असे झाले आहे परंतु, या पावसाचा म्हणावा तसा त्याचा फायदा झाला नाही उलट वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानच झाले.
त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसाची नितांत गरज असून, मान्सूनपूर्व पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत.मान्सून केरळात दाखलही झाला आहे तो आपल्याकडे केव्हा येणार ? हाच प्रश्न येथे शेतकऱ्यांना पडला आहे.
तालुक्याचे बागायती भागात खरी खरीपाचा पेरा कमी होत असला तरी ऊस लागवडीसाठी शेतकरी शेताची तयारी करत आहेत पण उजनीने इतिहासात पहिल्यांदाच निचांकी पातळी गाठली आहे.
त्यामुळे सध्या ते पाणीटंचाईचा सामना करत आहेत. आगामी पावसाळ्यात किती पाऊस होणार ? वजा 60 टक्क्यावर गेलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार का ? या प्रश्नामुळे शेतकरी भांबावला आहे.त्यामुळे पूर्वहंगामी ऊस लागवडी शक्यतो टाळल्या जात आहेत.