करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘या’ तीन जिल्हा प्रमुख मार्गाना राज्य मार्गाचा दर्जा द्या; बांधकाम मंत्र्यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘या’ तीन जिल्हा प्रमुख मार्गाना राज्य मार्गाचा दर्जा द्या; बांधकाम मंत्र्यांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुंभेज फाटा-पारेवाडी-जिंती चौक ते डीकसळ ते भिगवण तसेच कुगाव-शेटफळ-जेऊर-साडे.
व कोळगाव-निमगाव(ह)वरकुटे-
घोटी-ते जेऊर हे तीन जिल्हा प्रमुख मार्गांना राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी श्री. मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्याना जोडणारे हे प्रमुख मार्ग आहेत.त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते.

हे मार्ग सीना कोळगाव व उजनी लाभक्षेत्रालगत असल्यामुळे परिसरात ऊस,केळी,पप़ई सह ईतर अन्य फळ पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्यामुळे हा परिसर फ्रूट व शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो तसेच या परिसरात आठ ते दहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक याच मार्गावरून होते.

या परिसरातील समृद्धीसाठी कृषि क्षेत्राला व्यवसायिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी व विस्तिर्ण उजनी जलाशयातील पक्षी निरीक्षण, कृषी पर्यटन,मत्सअभ्यास केंद्र,वनस्पती अभ्यास केंद्र,नौकाविहार,जलपर्यटनाला चालना देण्यासाठी या मार्गाला राज्य मार्गांना दर्जा देऊन विकसित करणे गरजेचे आहे.

आपण या मागणीचा विचार करुन राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा. सदर निवेदनाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा,कार्यकारी अभियंता अकलूज, अधिक्षक अभियंता सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – करमाळा पंचायत समितीवर चक्क जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा; विद्यार्थ्यांवर का आली ही वेळ? शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर! वाचा सविस्तर

आँनलाईन सातबारा उतारा नुतनीकरणाची कामे व वांगी ग्रुप ग्रामपंचायतीचा निधी तात्काळ वर्ग करा; अन्यथा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल

करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, सिंचन, आरोग्य
रखडलेली औद्योगिक वसाहत, मांगी तलाव,जातेगाव टेंभुर्णी रस्ता,पुनर्वसनाचे रखडलेल प्रश्न,नविन शर्त व देवस्थान जमिनीचे प्रश्न,रेल्वे संदर्भातील प्रश्न,गायरान जमिन अतिक्रमण, केळी संशोधन केंद्र,लघू पशू चिकीत्सालय,बस स्थानक अशा विविध समस्यांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या कडे बागल गटाचे नेते,प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात करमाळा तालुक्यातील शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती नीळ यांनी दिली

karmalamadhanews24: