करमाळा तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस; खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड !

करमाळा तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस; खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड !

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने व सर्वच भागात चांगला पाऊस झाला आहे यामुळे येथील शेतकऱ्यांच्या आशा पद्धतीत झाल्या असून अनेक शेतकरी या पार्श्वभूमीवर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानात गर्दी करू लागल्याचे चित्र आहे. यामध्ये काही बियाणे व खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देऊन खते बियाणे खरेदी करावे लागत आहेत.

गेली चार ते पाच दिवसापासून करमाळा तालुक्यात सर्वत्रच चांगले परजनयमान झाले असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून ठवलेली आहे.आता पेरनियोग्य पाऊसही झाल्याने आता बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू झाली आहे. त्यातच बोगस व दुय्यम प्रतीची खते व बियाणेही अनेकदा शेकर्यांना देऊन फसवणूक केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हेही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

बी बियाणे खरेदी करीत असताना शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक दुकानातील तपासण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके तयार करावी तसेच या पथकांच्या कारवायांना जाहीर प्रसिद्धी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाला होता यावर्षी मात्र सुरुवातीपासूनच पावसाने चांगली बॅटिंग सुरुवात केली आहे.त्यामुळे शेतकरीराजा खुषीत आहे.

karmalamadhanews24: