करमाळा शासकीय रुग्णालयाच्या गलथानपणाच्या निषेधार्थ आरपीआय चे आंदोलन

करमाळा शासकीय रुग्णालयाच्या गलथानपणाच्या निषेधार्थ आरपीआय चे आंदोलन

करमाळा(प्रतिनिधी); – येथील जिल्हा उपरुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांकडे दूर्लक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या गलथानपणावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपाई (आठवले) चे यूवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे हलगीनाद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी यशपाल कांबळे यांनी उदागे नावाच्या एका महिलेच्या प्रसूतीवेळी रक्ताचे रिपोर्ट अन खाजगी रुग्णालयातील रिपोर्ट यात प्रचंड तफावत दिसून आली व सिझेरियनची शक्यता सांगितलेली असताना चक्क नॉर्मल डिलिव्हरी झाली या असल्या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात निवेदने देऊन कारवाई ची मागणी केली असता कसलाही प्रतिसाद न आल्याने आज आंदोलन करण्यात आले असल्याचे यशपाल कांबळे यांनी सांगितले.

राजकीय वरदहस्त असल्याने संबंधित अधिकारी असे वागत असल्याचे प्रतिपादन पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी व्यक्त केले. अधिका-यांना पाठिशी घालणा-या राजकीय नेतृत्वाचा देखील पर्दाफाश केला जाईल असे आव्हान देखील दिले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने उत्तर दिल्याशिवाय इथून हलणार नसल्याची ठाम भूमिका यशपाल कांबळे यांनी घेतली असता मा तहसिलदार जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाच्या प्रतिनिधी मांडवे मॅडम यांना आंदोलन कर्त्यां ना कारवाई ची माहिती देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा – करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आली रंगत 18 जागेसाठी तब्बल 154 अर्ज मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार, मग चित्र स्पष्ट..

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पुरस्कार जाहिर ; क्लिक करून वाचा नावे

या वेळी सतिश भोसले,सूहास ओहोळ, मराठा सेवा संघाचे नितीन खटके,बहुजन संघर्ष सेने चे राजाभाऊ कदम,नितिन दामोदरे, प्रफुल्ल दामोदरे, मातंग एकता आंदोलन चे युवराज जगताप. मीना भोसले यांची भाषणे झाली यावेळी प्रसेंजित कांबळे मयूर कांबळे अमोल गायकवाड सचिन गायकवाड धनराज सरोदे. शरद पवार. रंजीत कांबळे. किशोर कांबळे सुगत कांबळे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

karmalamadhanews24: