करमाळ्यात संविधान दिनी ‘संविधान बचाव मोर्चा’चे आयोजन; बहूजन समाज एकवटणार!

करमाळ्यात संविधान दिनी ‘संविधान बचाव मोर्चा’चे आयोजन; बहूजन समाज एकवटणार!

करमाळा(प्रतिनिधी); –संविधान बदलण्यास टपलेल्या ब्राम्हणशाही च्या विरोधात करमाळ्यात 26 नोव्हेंबर रोजी हजारो बहुजनांच्या उपस्थितीत संविधान दिनी संविधान बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला असून नागेशदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदरील मोर्चा संपन्न होणार असून या मोर्चा ला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाचा आर्थिक सल्लागार विवेक देवराॅय याने संविधान बदलण्यासंबंधी लेख लिहीला होता.

खासदार अनंत हेगडे याने ब्राम्हण परिषदेतील भाषणात “आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत असे विष ओकले होते, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी देखील राज्यसभेत बोलताना संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मनूवादी ब्राम्हणशाहीचे हस्तक असणारी हि विषवल्ली फोफावत चालली असून सर्व भारतीयांना हक्क व अधिकार देणारे अन समता, बंधूता, एकात्मता, जोपासणारे संविधान यांना नको आहे ते वाचवणे सर्वांची जबाबदारी आहे म्हणून संविधान बचाव मोर्चा चे आयोजन करण्यात आल्याचे नागेशदादा कांबळे यांनी सांगितले.
या मोर्चा च्या निमित्ताने संपूर्ण तालूक्यात संविधान जनजागृती बैठका आयोजित करण्यात आल्या व त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा – उंदरगावच्या बिनविरोध सरपंचांनी दिवाळी किट वाटप करून गरिबांची दिवाळी केली गोड

चार फेब्रुवारीला होणार करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

संविधानासाठी लोक स्वतःहून पूढे येत आहेत,रविवारी 26 नोव्हेंबर रोजी,डाॅ बाबासाहेब आंबेडकर पूतळा करमाळा येथून सूरू होणा-या या मोर्चास हजारो लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

karmalamadhanews24: