करमाळा येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा मेळावा संपन्न
करमाळा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बहुसंख्य मतांनी निवडून देऊन लोकसभेत पाठवा असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आर.पी.आय आठवले गट,
रा.स.प, रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्याचे आयोजन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केले होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,भारतीय जनता पार्टी व महायुतीने केंद्रात व राज्यात महिला, शेतकरी, विद्यार्थी, यांसह समाजातील सर्व घटकांसाठी अनेक लोक उपयोगी कामे केली आहेत त्या विश्वासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण आपले खासदार निंबाळकर यांना निवडून आणून दिल्लीत पाठवायचे आहे असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटलांची करमाळा दौऱ्यात यशस्वी खेळी झाल्याचे बोलले जात आहे.आजी माजी आमदार यासह सर्व प्रमुख राजकीय गटांची त्यांनी मोट बांधली आहे.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सर्वांचा भरघोस पाठींबा मिळाला आहे.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे, मा.आ.प्रशांत परिचारक, मा.आ. दीपक आबा साळुंखे, शंभूराजे जगताप,रश्मीदिदी बागल,शिवसेनेचे महेश चिवटे,रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अजय बागल, आर.पी.आय.चे अर्जुनराव गाडे व महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली व सर्वांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू व करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी राजकुमार पाटील, सचिन शिंदे,विलासराव घुमरे,चेतनसिंह केदार,महेश साठे,भरत आवताडे, कन्हैयालाल देवी, जयकुमार शिंदे, सुजित बागल,भगवानगिरी गोसावी, दिनेश भांडवलकर, प्रवीण जाधव, रामभाऊ ढाणे,पै अफसर जाधव, जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, उमेश पाटील, मोहन डांगरे, नितीनभाऊ झिंजाडे,अंगद देवकते, संजय शिलवंत, सुहास घोलप,दीपक चव्हाण,अभिषेक आव्हाड, राहुल कानगुडे,ओंकार बसवंती, बसवंतीमॅडम, संतोष वारगड, ज्योती शिंदे,पूजा माने व महायुती मधील घटक पक्षाचे गाव पातळीवरील पदाधिकारी,आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सेवा सोयायटीचे सदस्य,साखर कारखान्याचे आजी माजी संचालक,पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य यांसह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.