करमाळा सोलापूर जिल्हा

केतूर ग्रामपंचायतसाठी सरपंचपदासाठी एक डझन तर सदस्य पदासाठी 44 उमेदवारी अर्ज ! माघारीवर साऱ्यांचे लक्ष, ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर ग्रामपंचायतसाठी सरपंचपदासाठी एक डझन तर सदस्य पदासाठी 44 उमेदवारी अर्ज ! माघारीवर साऱ्यांचे लक्ष, ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

केतूर ( अभय माने ) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केतुर ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार (ता.20) रोजी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 12 तर 11 जागांसाठी 44 अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

केतूर ग्रामपंचायतचे सरपंचपद हे जनतेतून व एस सी साठी राखीव असल्याने त्या जागेसाठी 12 अर्ज आले आहेत तर सदस्यांसाठी चार प्रवाह मधून 44 अर्ज दाखल झाले आहेत.

सरपंच पदासाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार –

सत्यदेव देवकते, जयश्री देवकते, निवास उगले, विलास सोनवणे, मच्छिंद्र चव्हाण, अमोल चव्हाण, सारिका देवकते, सचिन विळेकर, धनाजी देवकते, शुभम देवकते, विजयराज देवकते, सुनील भोसले

प्रभाग 1 —-तीन जागा

शोभा कांनतोडे, सोनाली कानतोडे, भास्कर कोकणे, सुवर्णा गुलमर, रंजना कोकणे, निर्मला खाटमोडे, भानुदास राऊत, वैशाली कानतोडे

प्रभाग 2 – तीन जागा

प्रियंका निवले, अश्विनी कनिचे,पूजा कनिचे, रंजना मंजुळे, संगीता कनिचे, राजलक्ष्मी मोरे पाटील, सुवर्णा निकम, गायत्री खाटमोडे,सुवर्णा मंजुळे, कमल पवार, सुजित पाटील, राजेंद्र खटके, सागर पवार, सत्यवान निंबाळकर, अमोल मोरे पाटील, विश्वास मोरे पाटील, अमोल जरांडे, राजेंद्र खाटमोडे .

प्रभाग तीन—– दोन जागांसाठी

प्रशांत नवले संजय नवले, बाळासाहेब जरांडे, रामहरी जरांडे, सुनील नगरे,महादेव नगरे, बबन साळवे, धनाजी दैवकते

प्रभाग चार – तीन जागांसाठी

प्रियंका नवले, छाया शेंडगे,रूपाली महामुनी, शुभांगी विघ्ने, उज्वला निंभोरे, सुवर्णा निकम, जयश्री नगरे, शहाजी पाटील, रवींद्र विघ्ने, हरिश्चंद्र खाटमोडे

अर्ज माघार घेण्याचा दिवस बुधवार (ता.25) हा शेवटचा दिवस असल्याने यापैकी कोण माघार घेणार हे चा दिवशी ठरणार आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील,अंड.अजित विघ्ने, देवराव नवले,

माजी पंचायत समिती सभापती बापूसाहेब पाटील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटील,उदयसिंह मोरे पाटील, मकाई कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खटमोडे माजी सरपंच विलास कोकणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!