जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्याचे आदेश: वाचा सविस्तर
केत्तूर (अभय माने) जेऊर (ता.करमाळा) येथे ग्रामीण रुग्णालय झाले असल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे (ता.करमाळा) येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी मकाईचे संचालक गणेश झोळ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात झोळ यांनी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वाशिंबे, सोगाव, केतूर 1, केतूर 2, गोयेगाव, उंदरगाव, मांजरगाव, रीटेवाडी,राजुरी, पारेवाडी, हींगणी ही गावे तालुक्याच्या ठिकाणापासून दूर शेवटच्या टोकाला असून या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध नाही.
रात्री अपरात्री आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यास नागरीकांना करमाळा अथवा बारामती येथे उपचारासाठी जावे लागते.वेळेत उपचाराअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.या बाबींचा विचार करता.
जेऊर (ता.करमाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरीत करण्याची मागणी केली.या मागणीची सकारात्मक दखल घेत डाँ.तानाजी सावंत,प्रा.शिवाजी सावंत यांनी संबधित अधिकार्यांना प्रा.आ.केंद्र स्थलांतरीत करण्याते आदेश दिले.
जेऊरचे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळवण्यासाठी जातेगाव गावांनी प्रस्ताव दिला होता वाशिंबे गावाचा प्रस्ताव होता पण राजकारण न करता वाशिंबे गावालाच हे आरोग्य केंद्र द्यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख शिवसेनेला धरल्यामुळे वाशिंबेचा मार्ग मोकळा झाला.
-महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट)
Add Comment