करमाळा क्राईम; करमाळा महसूल विभागातील महिला अधिकारी काझी यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना जेऊर येथे अटक

करमाळा क्राईम; करमाळा महसूल विभागातील महिला अधिकारी काझी यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना जेऊर येथे अटक

जेऊर (प्रतिनिधी); करमाळा येथील महसूल विभागात कार्यरत असलेल्या मंडल अधिकाऱ्याला 20 हजार रुपयाची लाज घेताना अँटीकरप्शन ब्युरो ने रंगेहात पकडले आहे यामध्ये करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे शाहिदा युनूस काझी वय 42 असे यामध्ये पकडण्यात आलेल्या मंडलाधिकारी संशयित आरोपीचे नाव आहे.

उमरड येथील मंडलाधिकारी श्रीमती काजी यांनी तक्रारदाराला 25 हजार रुपयाची लाज मागितली होती त्यानंतर तक्रारदाराने अँटीकरप्शन ब्युरो कडे तक्रार केली होती वारस नोंदीसाठी तक्रारदाराने अर्ज केला होता त्यावर सुनावणी करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी 25000 रुपये श्रीमती काझी यांनी मागितले होते.

त्यावर तोडजोड होऊन वीस हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती ही लाच आज मंगळवारी जेऊर येथे असलेल्या मंडलाधिकारी कार्यालय येथे स्वीकारताना संशयित आरोपीला पकडण्यात आली.

या कारवाईसाठी पुणे येथील प्रतिबंधक विभागाची पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांनी मार्गदर्शन केले.

पर्यवेक्षण अधिकारी म्हणून सोलापूर येथील पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिले तर पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव पोलीस नाईक अतुल घाडगे पोलीस कॉन्स्टेबल सलीम मुल्ला शाम सुरवसे आदींनी सापळा रुसून सदरची कारवाई केली आहे.

एका महिला मंडळ अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने लाज घेताना पकडल्याने करमाळा महसूल कार्यालयात एकच खळबळ माजली आहे.

karmalamadhanews24: