***…अस्तित्वाची चाहूल — डिंग डॉंग…***

***…अस्तित्वाची चाहूल — डिंग डॉंग…***
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काल एका पाहुण्याकडे गेलो फ्लॅटची बेल दाबली पण आतला मंजुळ स्वर ऐकून दार उघडले तरी लवकर हात जाऊ वाटत नव्हतं कारण नुसता तो स्वर झंकार ऐकावा अशा विविध कंपन्यांच्या मधुर आवाजाच्या डोअर बेल्स बाजारात उपलब्ध आहेत घ्यायला गेल्यावर कोणती घेऊ आणि कोणती नको असं होतंय आता बघा दंत कथा म्हणजे नुसती ऐकीव माहिती…फार फार वर्षांपूर्वी डोअर बेल अस्तित्वात नव्हती राजे राजवाड्यांच्या काळात म्हणे प्रजेतील एखादा माणूस राज दरबारी आला तर बाहेर एका खांबाला सुताची दोरी बांधलेली असायची आत मधी ठराविक अंतरावर मंदिरासारखी घंटा बांधलेली असायची ती दोरी ओढल्यावर आतील घंटा वाजायची आतील भालदार चोपदार म्हणजे सुरक्षा रक्षक बाहेर येऊन चौकशी करून आत मध्ये निरोप द्यायचे आणि परवानगी येऊन त्या माणसाला आत सोडलं जायचं थोडक्यात म्हणजे डोअर बेलच म्हणावी लागेल.

तर डोअर बेल बद्दल सांगायचं झालं तर ते काय आहे आणि ते तिथं आहे… मी आहे किंवा मी इथं आहे…हे व्यक्त करणं म्हणजे अस्तित्व… तर अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ही संकल्पना अवलंबली तर तसं बघायला गेलं तर आपल्या अस्तित्वाची अथवा विशेष कार्याची जाणीव सभोवतालच्या वातावरणात दृश्य व्हावी हे इथून म्हणजे बघा सायकलची घंटी…गाड्यांचे हॉर्न…ट्रॅफिक पोलिसांची किंवा रेल्वेची शिट्टी… गिरणीचा भोंगा…घड्याळाचा गजर…हे आपण वेळ पाहून केलेली पूर्व सूचना म्हणावी लागेल… का तर सुस्थिती निर्माण व्हावी हा हेतू… तर वरील हे जे पूर्व संकेत आहेत त्यानुसार म्हणजे सायकलची घंटी व दुचाकीचे तसेच वाहनांचे हॉर्न हे रस्ता मागतात म्हणजे बाजूला व्हा असा संकेत रेल्वेची शिट्टी म्हणजे प्रवाशांनी आपापल्या सीटवर बसून सुरक्षित प्रवास करावा…चालू गाडी पकडू नये असा संकेत… रेल्वेचा गार्ड शिट्टी वाजवताना एक लॉंग व एक शॉर्ट म्हणजे चला आता निघूया तर नंतर दोन मिनिटांची शिट्टी म्हणजे दोनदा शॉर्ट याचा अर्थ आता निघतो असा असतो…एस टी ची घंटी म्हणजे कंडक्टरनी ड्रायव्हरला दिलेला इशारा तो पण थांबा अथवा गाडी सुरू करा म्हणजे एकदा किंवा दोनदा बेल देणे…तर गिरणीचा भोंगा म्हणजे जवळ किंवा आसपास राहणाऱ्या सर्व कामगारांना नोकरीवर बोलावण्याचा हा इशारा…

आणि हा इशारा ड्युटी सुरू होण्यापूर्वी साधारण पंधरा मिनिटे अगोदर असतो आता दारावरची बेल वास्तवतेमध्ये दार बंद असतं पण आपण आलेलो आहोत दार उघडा असा संकेत तसंच आपण पूर्व व्यवस्था केलेला प्रकार म्हणजे आपल्याला पहाटे पाच वाजता ड्युटी साठी झोपेतून उठायचं आहे त्यासाठी घड्याळामध्ये ठराविक वेळेचा गजर लावणे हे झाले आपल्या सोयीनुसार केलेली पूर्व रचना तसचं निसर्गाचं पण आहे विजांचा कडकडाट… दाटून आलेले काळे ढग…सुटलेला वारा…हे पाऊस येण्याची पूर्व सूचना दर्शवतात आणि आता डोअर बेल म्हणाल तर नाद निर्मितीचा शोध फार प्राचीन आहे आदिमानवाच्या काळापासून माणूस आवाज निर्मितीचे विविध प्रयोग करीत आलेला आहे आणि त्यातून प्रचलित झालेली अगदी अलीकडच्या काळापर्यंत धातूवर काहीही आपटून आवाज निर्मिती करण्याची पद्धत रूढ होती आजही आपण देवाच्या दारात म्हणजे मंदिरामध्ये असलेली घंटा वाजवून देवाला आपण आल्याची एक प्रकारे वर्दी देत असतो असा काहींचा भोळा भाव आहे आणि परमेश्वर शेवटी भक्तांच्या भोळ्या भावाचा भुकेला असतो घरात आलेल्या पाहुण्यांना यजमानाला आपण आल्याची चाहूल देण्यासाठी ही घंटा म्हणजे डोअर बेल कामाला येते विद्युत आणि चुंबकाचा शोध लागल्यानंतर हेच काम फक्त बटन दाबून होऊ लागले
यामध्ये विद्युत व चुंबकाचे तत्व आणि थरथरणारी हातोडी वापरून सलग प्रवाहित होणारी विद्युत धारा खंडित करून आपण आज ही वापरतो तशी डोअर बेल तयार केली गेली आणि डोअर बेलचे असंख्य प्रकार…आवाज… आणि संगती… आज बाजारात उपलब्ध आहेत ही बेल दूधवाल्यापासून…पोस्टमन पर्यंत सर्वांनाच उपयोगी पडणारी असते एक बटन दाबताच अख्ख्या घराला जागी करणारी ही बेल ही बऱ्याच दरवाजांचा अविभाज्य अंग नाहीतर अवयव म्हणावा लागेल आणि दुसरे म्हणजे नवीनच आलेल्या विविध आवाजाच्या व डिझाईनच्या डोअर बेल घराच्या सजावटीमध्ये त्यांचं महत्त्व आहे काही ठिकाणी पारंपरिक आवाजाची बेल म्हणजे नुसती टिंगटॉंग करणारी अशी म्हणजे घराच्या आतील सजावट जरी अत्याधुनिक असली तरी पारंपरिक बेल दरवाजावर लावल्याने एक अँटिक फील घराला आणू शकतो पुरातन वस्तूच्या दुकानांमध्ये किंवा प्रदर्शनात अशा बेल मिळतात पितळ…ब्रांझ…
कासे…निकेल…या धातूपासून बनवलेल्या पारंपारिक डोअर बेल मेन दरवाज्याच्या नक्षीकामानुसार वापरता येतात दरवाज्याला खास लाकडी कोरीव डिझाईन वापरलं असेल तर तो तपकिरी… काळा…किंवा नेमक्या लाकडी रंगात असेल तर तांब्याच्या घंटा साजेशा वाटतात अशा घंटा जाड धातूच्या बनवल्या असल्यामुळे त्यांचा होणारा नाद खणखणीत असतो या घंटा हलविण्यासाठी पातळ रस्सी किंवा साखळी ही घंटीला शोभून दिसते घंटी जर पितळ किंवा ब्रांझ असेल तर वेटोळे असलेल्या सुताची रस्सी वापरतात रस्सीच्या खालच्या टोकाला मूठ म्हणून जाड गाठ मारावी लागते.

हेही वाचा – 🌹 रानातला मांडव अन ढेकळातली पंगत 🌹

******* पालखी अन छबीना *******

दरवाजापुढे जर जागेला वाव असेल तर त्याखाली रोपांची…मातीची…किंवा धातूची…कुंडी ठेवावी त्यामुळे दरवाज्याच्या शोभेमध्ये आणखी भर पडते पारंपरिक डोअर बेल सारखाच इलेक्ट्रॉनिक डोअर बेल कडे सुद्धा बहुतेकांचा कल असतो ते एक फॅड झालंय सजावटीपेक्षा बेलच्या ध्वनीकडे जास्त लक्ष दिलं जात आधी अगदी साध्या टींगटॉंग..क्रिंग..पासून ओम नमो भगवते वासुदेवाय…श्री स्वामी समर्थ मंत्रांचा आलाप बेलमध्ये बसवून घेता येतो काही ठिकाणी पक्षांचे मंजूर आवाजातील गुंजन…बहारदार संगीत…अशा डोअर बेल घरातील वाढदिवस…सणासुदीला…किंवा घरात धार्मिक कार्य असेल तर त्या उत्सवामध्ये आणखीनच आनंदाचे वातावरण निर्माण करतात सध्याच्या युगात पूर्व सूचना म्हणून आपण कित्येक तरी उदाहरण डोळ्यापुढे आणू शकतो त्यामध्ये ॲम्बुलन्सचा सायरन… पोलीस गाडीचा सायरन… शाळेची घंटा किंवा रेल्वे स्टेशनवर लटकविलेला रुळाचा टुकडा त्याच्यावर लोखंडी खिळा आपटून वाजवलेली घंटा इत्यादी आवाजांची ध्वनी सूचना समजू शकतो परंतु काही ठिकाणी प्रदर्शन सर्कस किंवा काही प्रेक्षणीय प्रकल्प असेल तर अवकाशामध्ये एक प्रखर झोताची अशी विद्युत सर्च लाईट सोडली जाते ती लाईट खाली वर व आजूबाजूला फिरवली जाते त्यानुसार पूर्वसूचनेद्वारे त्या प्रकल्पाची आगाऊ सूचना आपल्याला मिळू शकते
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

karmalamadhanews24: