करमाळा तालुक्यातील ‘या’ सरपंचाला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी; अज्ञाता विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा तालुक्यातील ‘या’ सरपंचाला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी; अज्ञाता विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा(प्रतिनिधी); आवाटी तालुका करमाळा येथील माजी आमदार जयंतराव जगताप गटाचे कट्टर समर्थक साबीर खान गनी खान पठाण यांना एका अज्ञात व्यक्तीने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत करमाळा पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सरपंच साबीर खान यांना अज्ञात व्यक्तीने जीव मारण्याची धमकी दिली आहे त्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की साबीर तुला काय वाटतंय आवाटी ग्रामपंचायत तिचा सरपंच झाला तर आमदार झाल्यासारखे वाटते का? तू सरपंच झाल्यापासून आई घाल्या लई माजलास पुढच्या इलेक्शन पर्यंत आम्ही तुला ठेवत नाही तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तू गाव सोडून गावाबाहेर निघ तुला दाखवितो. आम्ही काय आहे, लय उडू नकोस. तू पुढचा इलेक्शन बघणार नाही.

तू ही लक्षात ठेव आमचे कोणीही वाकडे करणार नाही तुझे मोजकेच दिवस आता शिल्लक राहिले आहे आई घाल्या तू कधी ना कधी आमच्या तावडीत येईलच ना मग दाखवतो आम्ही कोण आहे आम्ही तुझा जीव घेणारच हे नक्की आहे तुला कुठे तक्रार करावयाचे ती कर तू आता जास्त नाटके करू नकोस आता जीव वाचवायचा बघ अशा पद्धतीने एका अज्ञात व्यक्तीने सरपंच खान यांना धमकीचे पत्र पोस्टद्वारे आवाटी तालुका करमाळा येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी पोस्टद्वारे पाठविले आहे.

सदरचे धमकीचे पत्र सरपंच खान यांना मिळतात खान यांनी करमाळा पोलीस यांच्याशी संपर्क साधून सदर बाप लक्षात आणून दिली आहे याबाबत करमाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

सरपंच साबीर खान पठाण यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय क्षेत्रात मात्र भलतीच खळबळ माजली आहे.

या घटनेची त्वरित चौकशी करून अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा अशी मागणी आवाटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान यांनी केली आहे.

karmalamadhanews24: