महाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी शहरी भागाकडे कल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी शहरी भागाकडे कल

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील विद्यार्थी वर्गानी शिक्षणासाठी शहरी भागाकडे धाव घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थीवर्ग बार्शी, इंदापूर, सोलापूर, बारामती, पुणे यासारख्या शहरी भागाला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दहावी, बारावी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर डिप्लोमा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी बार्शी, इंदापूर, सोलापूर, बारामती, पुणे शहराकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.विद्यार्थिनीचा जास्त कल बारामतीकडे आहे.बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. या ठिकाणी त्यांनी आवडीच्या चार ते पाच विद्यालयांची व महाविद्यालयांची निवड केली आहे.

हेही वाचा – सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण संपादन केल्याने, विद्यार्थी शहराकडे स्थलांतरित होत आहेत.विद्यार्थी आपल्या व पालकांच्या आवडीनुसार इंजिनियर, डॉक्टर, डी फार्मसी, विज्ञान शाखा, डिप्लोमा, आयटीआय आदी महाविद्यालयात गर्दी करत असून त्यामुळे त्यांची धावपळ व कागदपत्रांची जुळाजवळ सुरू झाली आहे.

litsbros