जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका स्वाती जाधव सेट परीक्षा उत्तीर्ण

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका स्वाती जाधव सेट परीक्षा उत्तीर्ण

करमाळा (प्रतिनिधी);
महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट यावर्षी 26 मार्च 2023 (रविवार) रोजी घेण्यात आली.
महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी युजीसी मान्यताप्राप्त नोडल एजन्सी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 38 व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र (Education) विषयामध्ये
जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षिका स्वाती सदाशिव जाधव उत्तीर्ण झाल्या आहेत.

 स्वाती जाधव या सध्या जि.प.प्राथ.शाळा मलठण, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विवाह झाल्यानंतर त्यांनी डी.एड. केले. प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर आपले शिक्षण न थांबवता जिद्द ,मेहनत व चिकाटीने ते सुरु ठेवत बी.ए. (इंग्लिश), एम. ए. (इतिहास) , एम. ए. (शिक्षणशास्त्र), बी. एड., डी. एस. एम. अशा प्रकारे पदवी, पदव्युत्तर पदवी या शिक्षणाचा टप्पा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच स्वतःची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उंचावत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथे शिक्षणशास्त्र विषयामधून डॉक्टरेट (Ph.d) साठी त्यांचे संशोधन व अभ्यास चालू आहे
शिक्षणशास्त्र (Education) विषयामधील सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून, शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.

हेही वाचा – करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे आगळे वेगळे दर्शन; एकादशी दिवशीच ईद असल्याने कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाने घेतला निर्णय

केतूर ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर; क्लिक करून वाचा कोणत्या वॉर्डातून कोणाला संधी?

या निवडीबद्दल कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांनी अभिनंदन केले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line