जिल्हा परिषद शाळा नेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

जिल्हा परिषद शाळा नेरले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

करमाळा प्रतिनिधी – दि.६ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.या वेळी इन्शा मोनिन,वैष्णवी आदलिंगे,अस्मिता गायकवाड,गौरी गवळी,रितेश काळे इ.विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली.

यावेळी शिक्षक दिपक ओहोळ सर यांनी बाबासाहेबांचे देशाप्रती असलेले योगदान व शिक्षण घेताना घेतलेले कष्ट आपल्या मनोगतात सांगितले.तर अभयकुमार कसबे सर यांनी बाबासाहेबांनी विद्यार्थ्यासाठी दिलेला संदेश सांगितला.शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग जाधव सर यांनी बाबासाहेबांचे विचार जीवनात अंगीकारण्याचे महत्त्व विषद केले.

हेही वाचा – माजी आमदार पुत्राच्या घरातच नळाला गटारीचे पाणी करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार मुख्याधिकारी लोंढे यांचे याकडे दुर्लक्ष

मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना

यावेळी जाधव सर, मोरे सर, आडेकर मॅडम व मनेरी सर यांनी मनोगते व्यक्त केली.शेवटी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील कविता सादर करून अभिवादन केले.

karmalamadhanews24: