जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्यास मंजूरी

जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्यास मंजूरी

केत्तूर ( अभय माने) जेऊर ता.करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे ता.करमाळा येथे स्थलांतरित करण्यास जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूरी मिळाली आहे.अशी माहीती मकाई सहकारी साखर कारखाना संचालक गणेश झोळ यांनी दिली.

यावेळी बोलताना झोळ यांनी सांगितले की जेऊर ता करमाळा येथे ग्रामीण रुग्णालय झाले असल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे ता करमाळा येथे स्थलांतरित करण्याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे मागणी होती.प्रा.सावंत यांनी सकारात्मक दखल घेत आरोग्य विभागास स्थलांतरण करण्याचे आदेश दिले होते.

आरोग्य विभागाने सर्व बाबींची तपासनी करुन जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा परिषद,जिल्हाआरोग्य समिती,जिल्हा नियोजन समिती यांकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार तिन्ही समित्यां कडून मंजूरी मिळाली असून वरिष्ठ कार्यालया कडे प्रस्ताव सादर केला आहे.त्यामुळे वाशिंबे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला असून इमारत बांधकामासाठी व कर्मचारी वसाहती साठी सहा कोटी हून अधिक निधी शासनाकडून मिळणार आहे.

या स्थलांतरणासाठी सरपंच तानाजी झोळ यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने लागणारे सर्व ठराव देऊन तसेच आ.संजयमामा शिंदे यांचे शिफारस पत्र देऊन सहकार्य केले असे झोळ यांनी सांगितले

वाशिंबे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरणास मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील रुग्णांवर तज्ञ डाॅक्टरांकडून विना शुल्क उपचार केले जाणार आहेत.त्यामुळे वाशिंबे ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे

हेही वाचा – करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सनमन

करमाळा तालुक्यातील ‘या’ दोन रस्त्यांसाठी 270 कोटी 81 लाख रूपये निधी मजूर; आ. संजयमामा शिंदे

वाशिंबे प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टर,नर्सेस, कंपाउंडर तसेच इतर सेवक वर्ग असून याअंतर्गत चिखलठाण,केडगाव, कोंढेज,शेटफळ,वाशिंबे या उपकेंद्रांचा समावेश आहे.

एकुण १७ गावातील ३९.८६६ लोकसंख्येचा समावेश आहे.वेगवेगळ्या साथीच्या रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य कार्य आहे

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line