हुमेरा हिने केला एक दिवसाचा कडक रोजा!

हुमेरा हिने केला एक दिवसाचा कडक रोजा!

करमाळा (प्रतिनिधी); रमजान महिन्यातील पवित्र असा एक दिवसाचा कडक रोजा हुमेरा पठाण हिने पूर्ण केला आहेसध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सोहळा रमजानचा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक असे उपवास अर्थात रोजा करतात.

या महिन्यांमध्ये रोजा करणाऱ्या बांधवांना विशेष असे महत्त्व दिले जाते मुस्लिम समाजात इस्लाम धर्मियांमध्ये पाच तत्त्वांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे अशाच पद्धतीचा कडक रोजा आवाटी तालुका करमाळा येथील सात वर्षीय हुमेरा अलीम पठाण हिने केला हुमेरा पठाण हिने त्याचा एक दिवसाचा रोजा करमाळा पुणे रोडवरील सहारा नगर येथील अरफात मशिदीमध्ये सोडला.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,, वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

आवाटी येथील स्थानिक रहिवासी तसेच सध्या करमाळा येथे न्यायालयात कार्यरत असलेले एडवोकेट अलीम हाजी हामजेखान खान पठाण यांची ही मुलगी असून लहान वयात कडक असा रोजा केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line