*केत्तूर येथे डुकराच्या कळपाने केले उभ्या पिकाचे नुकसान*
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात केत्तूर न.2 येथे रानडुकरांचा कळप उभ्या पिकांचे नुकसान करीत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. वनविभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
केत्तूर नंबर दोन येथील शेतकरी निवृत्ती निकम, महेश राऊत यांच्या ऊस पिकाचे तर नवनाथ राऊत यांच्या केळी पिकाचे व अंबर लोभे यांच्या चारा पिकाचे डुकराच्या काळपाने नुकसान केले आहे.
हेही वाचा – प्रा.राहुलकुमार चव्हाण जगदीशब्दाच्या राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित.
हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम
” डुकरांचा कळप उभ्या पिकांचे नुकसान करीत असून वन अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी यांनी सदर नुकसानीचा पंचनामा करावा व शासकीय मदत मिळावी.
-अभिजीत निकम,शेतकरी केत्तूर (करमाळा)
छायाचित्र केत्तूर: डुकराच्या कळपाने निकम यांच्या ऊस पिकाचे केलेलं नुकसान