करमाळा तालुक्यातील विविध गावात आंतरराष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा; हिसरे, गौंडरे येथे जनजागृती

करमाळा तालुक्यातील विविध गावात आंतरराष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा; हिसरे, गौंडरे येथे जनजागृती

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); युवा ग्राम विकास मंडळ संचलित कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन यु. एस.यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन गौंडरे येथील डॉ.हेडगेवार विद्यालयात आणि हिसरे येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समूह संघटक सौ.सारिका हनुमंत पवार यांनी संस्थेने महिला , बालकांचे प्रश्न, स्वच्छ्ता, लहान मुलांची हिंसा व शोषण यावर संस्था करीत असलेले काम याबाबत माहिती देण्यात आली.तसेच बालविवाह , बालमजूर यावर प्रतिबंध करणे किती गरजेचे आहे . त्याचे दुष्परिणाम त्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

शिक्षण घेत असताना येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जायचे याबद्दल माहिती देण्यात आली.मुलांना जागरूक कसे राहावे याविषयी माहिती दिली.बालविवाह प्रतिज्ञा घेतली.

निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विजेत्यांना शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले, त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

हेही वाचा – सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना प्रवेश बंदी; प्रशासनाला निवेदन, क्लिक करून वाचा सविस्तर!

के के लाईफस्टाईल करमाळयाच्या वैभवात घालणार भर; भव्यदिव्य अत्याधुनिक फॅमिली शोरुमचे होणार उद्घाटन

कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सांगडे सर, शिक्षक श्री.गोफणे सर, श्री. खाडे सर, श्री. गायकवाड सर, श्री . पवार सर,श्री .जगदाळे सर, श्री . निळ सर तसेच जिल्हा परिषद हिसरे शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोमीन सर,व सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल हजारे, व राणीताई निंबाळकर तसेच संगीता ओहोळ या उपस्थित होत्या या वेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line