दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची पुनरावृत्ती आणि सरावाची नितांत गरज
माढा प्रतिनिधी – दिनांक 21 जानेवारी रोजी पॉसिबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर उपळाई बुद्रुक येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना करावयाची तयारी या विषयावर अकॅडमीचे संचालक श्री अतुल ज्ञानेश्वर क्षिरसागर सर यांच्याकडून मार्गदर्शन आयोजन केले.यावेळी माजी विद्यार्थी तन्मय पडवळे श्री. नंदिकेश्वर विद्यालय मध्ये मार्च २०२४ विद्यालयात द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला होता.
त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर स्वतःचे अनुभव व्यक्त केले आणि म्हणतात ना अनुभव हाच आपला सर्वात जवळचा शिक्षक असतो, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी असणार टेन्शन कमी केले. आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. त्याचा वर्गमित्र शुभम शिंदे हाही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास उपस्थित होता.
हेही वाचा – खेळाडूमध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे – उदयसिंह मोरे पाटील
श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम यांचे घोटी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न
शिक्षकांबरोबरच आपल्यातीलच मित्र आपल्याला मार्गदर्शन करतो. याचा आनंद सर्व दहावी बरोबर इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचबरोबर अतुल सरांनी बोर्डाचा पेपरची वेळ संपत नाही तोपर्यंत पूर्णतः प्रयत्न करावे, तसेच कॉपी करण्याचा विचारही मनात आणू नये असा संदेश वजा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. उपस्थित दोघांचेही अकॅडमी तर्फे सत्कार करून छोट्याशा कार्यक्रमाचा समारोप झाला.