दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय कार्ड योजनेत समाविष्ट करा, अन्यथा आंदोलन करू; करमाळा गटविकास अधिकारी यांना निवेदन

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय कार्ड योजनेत समाविष्ट करा, अन्यथा आंदोलन करू; करमाळा गटविकास अधिकारी यांना निवेदन

केम (प्रतिनिधी संजय जाधव);
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं|बैठक 2020/प्र/क्र/नापु /28 नुसार निश्चित केलेल्या करमाळा तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना अंतोदय शिधापत्रिकामध्ये समविष्ठ करण्यात यावे असे नमुद असताना देखील पुरवठा विभागाकडुन कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नसल्याने संदिप तळेकर यांनी त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

दिव्यांग सिधापत्रिकाचे लाभाथ्र्याचे शिधापत्रिकेचे समावेशन दिसत नाही तसेच करमाळा तालुक्यातील जे लोक अत्यंत गरीब आहेत.

त्यांना व विभक्त केलेल्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यात 2013 पासुन हि उदासिनता दिसुन येत आहे. करमाळा तालुक्यातील लग्न झालेल्या मुली, मयत झालेले शेतकरी यांचा लक्षांश आत्तापर्यंत पुर्ववत करण्यात आलेला नाही.

लक्षांश पुर्ववत करण्यात यावा व आपल्या स्तरावरून करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग लाभार्थी व्यक्तींचे व फॉर्म भरून घेवुन यादी प्रसारीत करावी असे आदेश दयावा व जे अन्न सुरक्षेचे लाभार्थी इनकम टॅक्स भरतात त्यांची नावे अन्न सुरक्षेचा यादीतुन नावे काढुन टाकण्यात यावीत व गरीब लाभाथ्र्यांची नावे समाविष्ट करण्यात यावीत.

हेही वाचा – काळजी घ्या! राज्यात डोळ्यांची साथ फोफावली; आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही ‘ महत्वाची माहिती

पोथरे येथे होतेय राजरोसपणे दारू विक्री; आक्रमक महिलांनी काढला करमाळा तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा

याबाबत पुढील 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास 25 आॅगस्ट रोजी दिव्यांग व्यक्ती व शेतकरी लाभार्थी वर्ग यांना घेवुन तहसिल कार्यालसमोर प्रहार स्टार्इलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line