ध्येय प्रतिष्ठान माढा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न मोफत करिअर व मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ध्येय प्रतिष्ठान माढा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न

मोफत करिअर व मार्गदर्शन शिबिरास
विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माढा प्रतिनिधी :
माढा येथील ध्येय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचालित ध्येय प्रतिष्ठान यांच्या वतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी चांगल्या गुणांनी यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा दिनांक 18 जून रोजी माढ्यातील जगदाळे मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ तसेच बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडिया लिमिटेडचे चेअरमन रणजितसिंह बबनरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माढा शहराच्या नगराध्यक्षा मीनलताई साठे या होत्या.

दहावी व बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना
दहावी बारावीनंतर कोणती शाखा निवडावी करिअरच्या संधी , स्पर्धा परीक्षा मधील करिअरच्या संधी याविषयी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते.यावेळी पालक आणि विद्यार्थी यांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, माजी जि.प. सदस्य झुंजार नाना भांगे, गुरुराज कानडे, नितीन बापू कापसे, संभाजी साठे, हृदयरोग तज्ञ डॉ. विकास मस्के, मा.न.पं विरोधी पक्ष नेते राजू गोटे, उपळाई(खु.) सरपंच संदीप भैया पाटील, यु.एफ. जानराव, कक्ष अधिकारी मंगेश गाडेकर,

हेही वाचा – करमाळा येथील वादग्रस्त व्हॉट्सॲप पोस्ट प्रकरणी ‘त्या’ ग्रुप ॲडमिनला अतिरिक्त सत्र न्यायालयाचा दिलासा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बहुजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप

गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, डॉ. महादेव थोरात, प्रेस क्लब अध्यक्ष मदन चवरे, काँग्रेस जिल्हासंघटक जहीर मनेर, शहराध्यक्ष दत्ता अंभोरे, सुधीर लंकेश्वर , राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनिकेत चवरे, शिवसेना शहराध्यक्ष भैय्या खरात, पत्रकार आयुबखान शेख, अमर गायकवाड यांच्यासह ध्येय प्रतिष्ठानचे दिनेश गाडेकर,भारत भाकरे, डॉ.अरविंद कांबळे, ॲड.यासीन शेख तसेच विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line