दहाच्या चलनी नोटांची व्यवहारात टचाई: आहेत त्या नोटा जीर्ण व फाटक्या

दहाच्या चलनी नोटांची व्यवहारात टचाई: आहेत त्या नोटा जीर्ण व फाटक्या

केत्तूर ( अभय माने) सध्या बाजारपेठेमध्ये दहा रुपयांची नाणी व नोटांची नोटांच्या टंचाईमुळे छोटे व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यातच आणखी एक प्रश्न समोर उभा राहिला आहे तो म्हणजे नोटबंदीनंतर केंद्र सरकारने 10,20, 50, 100,व 500 रुपयांच्या नोटा नवीन नोटा चलण्यात आणल्या.या नवीन नोटांच्या नोटा चलनात आणताना या नोटांच्या कागदाचा दर्जा कमी प्रतीचा असल्याने त्या लवकर जीर्ण होत आहेत त्यांना सांभाळणे, खिशात वा पाकीटात ठेवणे अवघड होत आहे.जीर्ण व फाटलेल्या नोटा बाजारपेठेत कोणीही घेत नाही तर बँकही स्वीकारत नाहीत.त्यामुळे सर्वसामान्य माणसांची पैसा असूनही ससेहोलपट होत आहे.

सर्व व्यवहार हे ऑनलाईन होत असले तरी, ग्रामीण भागातील लोकांकडे ती सुविधा नाही अथवा त्यांना ती वापरता येत नाही.त्यामध्येही रेंजचा प्रॉब्लेम आहेच त्यामुळे छोटे व्यावसायिक व ग्राहक यांच्यात नाहक वादावादीचे प्रसंग होत आहेत.

हेही वाचा – जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात,,,,,, वीज बिल थकल्यामुळे वीज महामंडळाने केले वीज कनेक्शन बंद संभाजी ब्रिगेड ने दिला आंदोलनाचा इशारा

उन्हाचा चटका! बाजारात रसदार , थंडगार फळांना मागणी वाढली!

रिझर्व बँकेने संबंधित बँकांना या जीर्ण व फटक्या नोटा स्वीकारण्याची आदेश द्यावेत तसेच दहाच्या नोटा व नाणी जास्त प्रमाणात चलनात आणाव्यात अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

karmalamadhanews24: