धक्कादायक! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आठ गोळ्या झाडून खून

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आठ गोळ्या झाडून खून 

सांगली शहरातील वादग्रस्त बाबा ग्रुपचा प्रमुख नालसाब मुल्ला (वय ४१, रा. गुलाब कॉलनी) याचा त्याच्या घरासमोरच गोळ्या झाडून खून करण्यात आला. हल्लेखोरांनी आठ गोळ्या झाडल्या असून त्यातील पाच गोळ्या मुल्ला याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
 रात्री आठच्या सुमारास माने चौक लगत असणाऱ्या परिसरात ही घटना घडल्याने सांगली पुन्हा हादरली. मोका टोळीतील कुख्यात गुन्हेगार आणि खासगी सावकार मुश्‍ताक मुल्ला याचा तो भाउ होता. मृत नालसाब याच्यावरही मोकातंर्गत कारवाई करण्यात आली होती.

तो सद्या जामिनावर मुक्त होता. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सद्या कार्यरत होता. दरम्यान खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पूर्वीचा वाद किंवा अन्य कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 नालसाब मुल्ला यांचे शंभर फुटी रस्त्यावर माने चौकापासून काही अंतरावर बाबा चौकात निवासस्थान, कार्यालय व बांधकाम साहित्य विक्रीचा डेपो आहे.  रात्री आठच्या सुमारास निवासस्थानाबाहेर असलेल्या वाचनालयाजवळ थांबला होता. तेव्हा अंधारात दुचाकीवरून दोघेजण तेथे आले.


क्षनात त्यांनी गोळीबार केला. मुल्ला याच्या छातीवर व पोटावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांच्यासोबत आणखी दोघे असावेत असा संशय आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून मुल्ला याच्या घरातील व परिसरातील नागरिक धावले. तेव्हा मुल्ला गंभीर अवस्थेत होता. त्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान मृत्यू झाला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line