श्री.मकाई सहकारी साखर कारखान्यावर पुनश्च बागल गटाची सत्ता; क्लिक करून वाचा, विजयी व पराभूत उमेदवारांची नावे व कोणाला किती मते मिळाली?

श्री.मकाई सहकारी साखर कारखान्यावर पुनश्च बागल गटाची सत्ता; क्लिक करून वाचा, विजयी व पराभूत उमेदवारांची नावे व कोणाला किती मते मिळाली?

करमाळा(प्रतिनिधी);  करमाळा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत लोकनेते दिगंबरराव बागल या पॅनलने एक हाती सत्ता मिळवली असून या निवडणुकीमध्ये झोळ यांच्या मकाई परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीमध्ये लोकनेते दिगंबरराव बागल पॅनल सर्वच्या सर्व जागा जिंकून पुनश्च एकदा मकाई कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.

तालुक्यातील श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी मध्ये सुरवातीपासूनच बागल गटाची आघाडी होती. मात्र या निकालात बागल गटाच्या सर्व जागा विजयी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या फेरीपासून बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते.

या निकालानंतर बागल गटाच्या उमेदवारांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासहित बागल गटाच्या यांच्या निवासस्थानी जल्लोष साजरा केला मकाई सहकारी साखर कारखान्यातील लोकनेते दिगंबरा व बागल पॅनलचे यापूर्वी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

ते उमेदवार पुढीलप्रमाणे

ऊस उत्पादक चिकलठाण गटामधून सतीश नीळ, दिनकर सरडे

ऊस उत्पादक वांगी गटामधून सचिन पिसाळ व युवराज नाना रोकडे

तर संस्था प्रतिनिधी गटामधून नवनाथ बागल

याशिवाय अनुसूचित जाती गटामधून कोर्टी चे आशिष गायकवाड तर अनुसूचित जमाती मधून बापू चोरमुले

याशिवाय इतर मागासवर्गीय गटामधून अनिल अनारसे हे यापूर्वीच बागल गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

याशिवाय आज झालेल्या बागल गटाच्या नऊ जागांसाठी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत ते विजयी उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे

महिला राखीव गटामधून कोमल करगळ मते ८२५१

अश्विनी झोळ ८२३२

याशिवाय ऊस उत्पादक मांगी गटामधून दिनेश भांडवलकर ८२५६,

अमोल यादव ८१६६,

तसेच ऊस उत्पादक भिलारवाडी गटातून अजित झांजुर्णे ८२६७

रामचंद्र हाके ८१२९

आणि ऊस उत्पादक पारेवाडी गटामधून रेवननाथ निकत ८३९०,

संतोष पाटील ८३८३,

उत्तम पांढरे ८०९४ हे उमेदवार विजयी झाले आहेत.

 याशिवाय प्राध्यापक रामदास झोळ यांच्या मकाई परिवर्तन पॅनल मधील पराभूत उमेदवाराची नावे व मते पुढील प्रमाणे

महिला राखीव गट सुनिता गिरंजे १४३५

ऊस उत्पादक मांगी गट सुभाष शिंदे 14 65

ऊस उत्पादक भिलारवाडी गट सुनिता गिरंजे 1328

आप्पा जाधव ऊस उत्पादक पारेवाडी गट गणेश चौधरी – १५४६

अशा पद्धतीने झो यांच्या उमेदवारांना मते मिळाली आहेत.

karmalamadhanews24: