क्राइम सांगोला सोलापूर जिल्हा

धक्कादायक! शतपावलीसाठी गेलेल्या PSI ची निर्घृणपणे हत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! शतपावलीसाठी गेलेल्या PSI ची निर्घृणपणे हत्या

सोलापुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सोलापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सोलापुरातील सांगोला तालुक्यात पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सूरज चंदनशिवे असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जेवण झाल्यावर काल रात्री बाराच्या सुमारास शेताबाहेर रस्त्यावर शतपावलीसाठी गेले असताना अज्ञातांकडून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

काय घडले नेमके?
सूरज चंदनशिवे सध्या गावाकडे शेतात राहायला आला होता. रोज जेवण झाल्यावर रात्री उशिरा त्याला शतपावली करायची सवय होती. त्याचपद्धतीने काल रात्री तो जेवण झाल्यावर वासूद केदारवाडी रोडवर शतपावली करत होता. मात्र त्याच वेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. रात्री तो परत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला असता पहाटे फिरायला आलेल्या काही जणांना सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह शेतात दिसला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.


दोन महिन्यांपूर्वी पोलीस दलातून बडतर्फ
सूरज विष्णू चंदनशिवे हा पोलीस उपनिरीक्षक होता. 2018 साली झालेल्या वारणानगर इथल्या नऊ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सूरज चंदनशिवेवर गुन्हा दाखल होऊन त्याचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेऊन सध्या सांगली पोलीस मुख्यालयात कंट्रोल विभागात कार्यरत होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. एका पोलीस अधिकाऱ्याची अशा रितीने झालेल्या निर्घृण हत्येमुळे सांगोला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!