चार हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात पकडले

चार हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात पकडले

सोलापूर(प्रतिनिधी); पोलीस हवालदाराला चार हजारांची लाच स्वीकारताना एमआयडीसी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ठेकेदारांकडून ताब्यात घेतलेली गाडी तक्रारदारास देण्याऐवजी चार हजारांची लाच स्वीकारताना एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार इस्माइल बागवान याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदाराची मोटारसायकल ही काम करीत असलेल्या ठेकेदारांनी बळजबरीने ठेवून घेतली होती याबाबत तक्रारदारांनी रितसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस हवालदार इस्माइल बागवान यांनी ठेकेदारांकडील मोटारसायकल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून ठेवली.

ही परत तक्रारदारांनी मागितली असता हवालदार इस्माइल बागवान यांनी चार हजार रुपयाची लाच मागितली.

याबाबत तक्रारदारांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रितसर तक्रार मांडल्यानंतर शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार इस्माइल बागवान याला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा – अकरा गुन्हात आरोपी असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास करमाळा येथून अटक; ५ लाखाचे दागिने ही हस्तगत, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी

कौतुकास्पद; करमाळा तालुक्यातील वांगीची सायली कारंडे प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम

ही कारवाई पुणे विभागीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे,श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, अंमलदार पकाले, नरोटे, किणगी यांनी केली.

karmalamadhanews24: