सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; करमाळ्यातील लीड स्कुलमध्ये शौर्या किशोर शिंदे प्रथम

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; करमाळ्यातील लीड स्कुलमध्ये शौर्या किशोर शिंदे प्रथम

करमाळा(अभय माने) – सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून येथील लीड स्कूलची विद्यार्थिनी शौर्या किशोरकुमार शिंदे ही ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तिला एकूण ५०० पैकी ४८४ गुण प्राप्त झाले आहे.

करमाळा येथील लीड स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण २० विद्यार्थी बोर्ड परीक्षेला बसले होते. ते सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान शौर्या शिंदे प्रथम तर आदित्य गजानन शिलवंत (९४.८० टक्के) द्वितीय, मनीष बाबुराव लावंड (९४.४० टक्के) तृतीय आणि विभावरी पवार व कल्याणी वाघमारे प्रत्येकी ९२.८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक अशाप्रकारे यशस्वी झाले आहेत.

लीड स्कुलचे संचालक सुमित मेहता, स्मिता देवरा, प्रबंधक अशोक देवरा, अध्यक्ष नितीन जिंदाल, प्राचार्य बपन दास, समन्वयक विनोद भांगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – उन्हाळी सुट्ट्या.. एस् टी बसेसला गर्दीच गर्दी; अनेक बसेस नादुरुस्त.. करमाळा समस्यांचे आगार!

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

यावेळी बोलताना प्राचार्य दास यांनी योग्य नियोजन आणि स्वयं शिस्त यामुळे यश मिळण्यास मदत होते. असे स्पष्ट करत गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले. तर प्रथम आलेली शौर्या हिने नियमित अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले असल्याचे सांगितले.

karmalamadhanews24: