भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंदाधुंद व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी कुटुंबासहीत करणार करमाळा तहसील समोर आत्मदहन

भूमी अभिलेख कार्यालयाच्या अंदाधुंद व भोंगळ कारभारा विरोधात साडे येथील शेतकरी कुटुंबासहीत करणार करमाळा तहसील समोर आत्मदहन

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील साडे येथील शेतकरी विकास बापू खराडे हे करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अंदाधुंदी व भोंगळ कारभाराविरोधात वैतागले असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

त्यांनी आपली जीवन यात्रा कुटुंबासहित तहसील कार्यालय समोर आत्मदहन करून संपविणार असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे सोलापूर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे याची सर्वस्वी जबाबदारी करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

श्री खराडे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मी साडे येथील रहिवासी असून मी माझे शेतीत वस्तीवर माझे कुटुंबासह राहत आहे गट नंबर 100 मध्ये माझे सह भाऊ व इतर भावकी यांचे क्षेत्र आहे सदर गटाची मोजणी 20/ 12/ 2018 व 10 /12 /2022 रोजी श्री मिश्किल व श्री एस एफ चौरे यांनी करून वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत तसेच माझे शेजारील गट नंबर 102 ची 5/07/ 2021 रोजी मोजणी होऊन श्री घुगे व व्ही व्ही मोठे यांनी करून वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत.

गट व क्षेत्र एकच असून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी मोजणी करून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत यामध्ये नक्कीच काहीतरी काळेबेरे असू शकते मोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला कधीच विश्वासात घेतले नाही आम्हाला नीट बोलले सुद्धा नाहीत.

या प्रकाराने मला व माझे कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे असे निवेदनात श्री खराडे यांनी म्हटले आहे
तरी मौजे साडे तालुका करमाळा येथील गट नंबर 100 व गट नंबर 102 ची चुकीची मोजणी करणाऱ्या संबंधित भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्याची खातेनिहाय चौकशी करावी.

हेही वाचा – भंगारा पेक्षा ही कांद्याला कमी भाव; हमीभाव व अनुदान जाहीर करा अन्यथा रास्ता रोको करू; रासपचे करमाळा तहसीलदारांना निवेदन

जागतिक महिला दिन विशेष! टेम्पो चालवून हाकते ती संसाराचा गाडा; अंजनगावच्या सुनेची अभिमानास्पद कहाणी

तसेच या प्रकरणाची त्वरित चौकशी न झाल्यास मी माझ्या कुटुंबासहित येत्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे श्री खराडे यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे

निवेदनाच्या प्रती श्री खराडे यांनी अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडवणीस, माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, सोलापूर उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी, तहसीलदार करमाळा, उपअधीक्षक भूमी अभिलेख करमाळा यांना पाठवल्या आहेत.

karmalamadhanews24: