उंदरगाव येथील भूमिपुत्रांचा सन्मान संपन्न

*उंदरगाव येथील भूमिपुत्रांचा सन्मान संपन्न*

केत्तूर ( अभय माने) उंदरगाव (ता. करमाळा) येथील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेणाऱ्या व नावलौकिक मिळवणाऱ्या तरुण व नागरिकांचा ग्रामपंचायतच्या वतीने भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला.

गावांमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प गावांमध्ये ग्राममस्वच्छतेची कामे करत आहेत. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमसाठी आय एफ एस अधिकारी आप्पासाहेब निकत सेवानिवृत्त अभियंता चांगदेव पाटील, ग्लोबल सायन्स इंस्टिट्यूटचे महेश निकत, सोमनाथ पाटील, प्रा.राजेंद्र निकत, सोमनाथ कांबळे, मेजर सिताराम खरात, नारायण कांबळे, श्रीधर कांबळे, ग्रामसेवक संतोष कांबळे, जोतिराम पाटील, नामदेव पाटील, ऑड सोमनाथ कोकरे, प्रवीण गरदडे, लक्ष्मण पाटील, गणेश जावळे, सागर कुंभार, सेविका जयश्री, ताकमोगे स्वाती सरडे, मदतनीस भारती जावळे, कोमल कांबळे, वंदना शिंदे यांच्यासह इतर भूमिपुत्रांचा फेटा फळांचे रोप व् सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

हेही वाचा – श्री किर्तेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सह शिवमहापुजेचे आयोजन.

जिजाऊ जयंती निमित्त कुंभेज येथे 102 जणांचे रक्तदान .

जिल्हा समन्वयक लक्ष्मणराव राख् यांनी गावच्या भूमिपुत्रापुढं मदतीसाठी पदर पसरला त्यानुसार अनेकांनी भरघोस मदत यावेळी जाहीर केली या सन्मानासाठी सरपंच युवराज मगर उपसरपंच शिवाजी कोकरे ग्रामसेवक यशवंत कुदळे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

छायाचित्र- उंदरगाव(ता.करमाळा): भूमिपुत्रांचा फेटा बांधून सन्मान करताना मान्यवर

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line