श्री किर्तेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सह शिवमहापुजेचे आयोजन.
केत्तुर-:
केत्तुर येथिल पुरातन व प्रसिध्द असलेल्या श्री किर्तेश्र्वर देवस्थान येथे २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सह शिवमहा पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.योगीराज गुरुवर्य ह भ प रणजीत बापू यांच्या कृपा आशीर्वादाने व तमाम श्री किर्तेश्वर भाविक भक्तांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२१ फेब्रुवारी ते दि.२८ फेब्रुवाीपर्यंत या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे.
हेही वाचा – जिजाऊ जयंती निमित्त कुंभेज येथे 102 जणांचे रक्तदान .
जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांची निवड
पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते ८ श्री किर्तेश्वर अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १ शिवमहापूजा,दुपारी २ ते ५ शिवलीला आमृत ग्रंथाचे आर्थासहित पारायण,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत हरीकिर्तन,रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत हरी जागर अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून पंचक्रोशीसह तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.