आवाटी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद

*आवाटी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद*

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील आवाटी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने अकलूज येथे सहलीचे आयोजन केले होते .यावेळी सकाळी सहलीला जाताना गावच्या सरपंच तब्बसूम खान आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नलवडे यांनी गाडीचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांनाआणि शिक्षकांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी सहलीत एकूण 47 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .

अकलूज येथील अकलाई देवीचे दर्शन करून सहलीच्या प्रारंभ करण्यात आला .नंतर सर्व विद्यार्थ्यांना अकलूज किल्ल्यावरील संपूर्ण शिवसृष्टी दाखवण्यात आली .यावेळी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहास चित्ररूप दाखवला .आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांनी सयाजीराजे पार्क येथे भेट दिली यावेळी मुलांनी पार्कमध्ये बोटिंग स्विमिंग तसेच पार्कमधील सर्व राईड्स खेळण्याचा आनंद घेतला .

हेही वाचा – उंदरगाव येथे ग्रामस्वच्छता सप्ताहाचे आयोजन !* *विविध क्षेत्रातील अधिकारी व प्रबोधनकार,यांची सप्ताहामध्ये मांदियाळी !

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलन वर्ष सहावे मोठ्या उत्साहात संपन्न

यावेळी सहलीमध्ये दिवसभर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता .या सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता देशमुख शिक्षिका शबाना मुलाणी आणि मधुकर अंधारे सर यांनी परिश्रम घेतले .

karmalamadhanews24: