*उंदरगाव येथे ग्रामस्वच्छता सप्ताहाचे आयोजन !* *विविध क्षेत्रातील अधिकारी व प्रबोधनकार,यांची सप्ताहामध्ये मांदियाळी !*
केत्तूर (अभय माने) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय् सेवा योजना +2 स्तर यांच्या माध्यमातून “युवकांचा ध्यास.ग्राम व् शहर विकास” हे ब्रीद घेऊन उंदरगाव (ता करमाळा) येथे गावातील स्वच्छ्ता,शोषखड्डे,करण्याचा उपक्रम हाती घेतला असून ग्रामपंचायतने ग्रामस्वच्छता मोहिमेची जोरदार तयारी केली आहे या सप्ताहमध्ये कृषि विषयक,ग्रामविकास,अंधश्रद्धा, ग्रामीण लोककला भारुड या प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार असून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा होणार आहे.
डॉ कोमल शिर्के व टीम आरोग्य तपासणी करणार आहेत, तर डॉ मनिष यादव व टीम पशुधन लसिकरण करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार (ता. 18) ते 24 जानेवारी या कालावधीत आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सहसचिव श्रीमती मीनाक्षी राऊत,शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्ष श्रीमती मंजुषा मिस्कर,शिक्षण उपसंचालक पुणे हारुण आतार,सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.ज्योती परिहार,म्हसवडचे प्रा.प्रकाश निंबाळकर, विभागीय समन्वयक रा से यो पोपटराव सांबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, तहसिलदार शिल्पा ठोकडे,पोलीस निरिक्षक विनोद घुगे,गटविकास अधिकारी डॉ अजित कदम,गटशिक्षण अधिकारी जयंत नलवडे, कृषिअधिकारी देवराव चव्हाण,पाणी फाउंडेशनचे समन्वयक आशिष लाड व प्रतीक गुरव हे अधिकारी सदिच्छा भेट देणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ एल बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी मुख्याध्यापक रमेश यादव रामहारी ढेरे,अशोक भोसले तलाठी शंभु कन्हेरी कृषि सहाय्यक सागर होळकर उपस्थित राहणार आहेत.या सप्ताहमध्ये स्मार्ट व्हिलेज संकल्पनेवर प्रा.डॉ सुधीर इंगळे यांचं व्याख्यान तर “डोळे असून आंधळे कसे” या विषयावर श्री दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांचे व्याख्यान होईल केळी पिकावर विनोद देशमुख तर ग्रामीण विकासात युवकांचे योगदान या विषयावर डॉ.सतीश देसाई व मी गाडगे महाराज बोलतोय या विषयावर समाजसुधारक फूलचंद नागटिळक यांचे व्याख्यान होणार आहे.
हेही वाचा – प्रा.राहुलकुमार चव्हाण जगदीशब्दाच्या राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित.
हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम
उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे संभाजी किर्दाक रासेयो चे जिल्हा समन्वयक प्रा लक्ष्मणराव राख, प्रा आर जी श्रीरामे, प्रा एस एम् पाटील, प्रा.सुजाता भोरे, प्रा एम् बी धिंदळे, प्रा गजेंद्र रोकडे ,ग्रामसेवक यशवंत कुदळे, सरपंच युवराज मगर,उपसरपंच शिवाजी कोकरे व ग्रामपंचायत कर्मचारी सागर कुंभार हे परिश्रम घेत आहेत सात दिवसाच्या कालावधी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या राहण्याची व जेवणाची उत्तम सोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असून ग्रामस्वच्छ्ता कामासाठी गावातील युवक वर्ग महिला व नागरिकही सहभागी होणार आहेत.