आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न;55 रक्तदात्यांनी केले रक्तदान

आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न;55 रक्तदात्यांनी केले रक्तदान

माढा प्रतिनिधी

पंढरपूर माढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार बबनदादा शिंदे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्यातून 5 हजार बाटल्या रक्त संकलनाचा संकल्प केला असून याचा एक भाग म्हणून दि. 25 ऑगस्ट ते दि. 29 ऑगस्ट या कालावधीत वाढदिवसानिमित्त अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.या निमित्त अंजनगाव खेलोबा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्त संकलन सोलापूर येथील हेडगेवार रक्तपेढी यांनी केले.

यावेळी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सज्जनराव जाधव, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विनायक चौगुले, माजी सरपंच आप्पासाहेब वाघमोडे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे परचेस ऑफिसर सचिन चौगुले साहेब ,माजी सरपंच सुवार्तीक नाईक, माजी सरपंच भागवत चौगुले,मदन आलदर ,नेताजी लोंढे, सुरेश जाधव,

हेही वाचा – तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री खेलोबा विद्यालयाला कबड्डी मध्ये अजिंक्यपद अकोले संघाबरोबर चुरशीच्या अंतिम सामन्यात मुलींनी मारली बाजी

आ.सुभाष देशमुख यांना बेदाणा उत्पादकांचे निवेदन ; शालेय पोषण आहारात त्वरित बेदाणा सुरू करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

बबनरावजी शिंदे शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड तुर्क पिंपरी कारखान्याचे ओव्हरसीयर प्रशांत चौगुले ,रमेश गायकवाड, विशाल नाईक सर,शरद गायकवाड ,नागेश पाटोळे, संजय गायकवाड , दादासाहेब वाघमोडे, रामचंद्र चौगुले,बालाजी पाटील, मारुती शेंडगे ,शंकर जाधव, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आणि बबनरावजी शिंदे शुगर केवड कर्मचार तसेच अंजनगाव खेलोबा ,लोंढेवाडी ,कुंभेज येथील नागरिक उपस्थित होते.

 

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line