आई, वडील रोजंदारी वर कामाला, केमच्या श्रावणीने ९६ टक्के गुण मिळवत गाठले यशाचे शिखर

आई, वडील रोजंदारी वर कामाला, केमच्या श्रावणीने ९६ टक्के गुण मिळवत गाठले यशाचे शिखर

केम(प्रतिनिधी संजय जाधव);
मेहनत, जिद्द आणी काहितरी करण्याची धडपड यांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत मात करत आई वडील रोजंदारीवर काम करणाऱ्या मुलीने दहावीत ९६ टक्के गुण मिळवून केम केंद्रात पहिली या यशामुळे तिनें सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

केम येथील श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मधील कु, श्रावणी वेदपाठक हिच्या आई, सोनिया वेदपाठक या केम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोजंदारीवर कॉम्प्युटर कामे करतात तर वडील केम येथील डि,सी,सी बॅंकेत रोजंदारीवर शिपाई म्हणून काम करत आहेत.

अश्या परिस्थितीत य जिद्दीने अभ्यास करून यश संपादित केले हिला आधार म्हणून केम येथील खाजगी क्लासेसच्या संचालिका सौ नागटिळक मॅडम यानी तिचा परिस्थिती तीच्या विचार करून तिचा मोफत क्लास घेतला व मार्गदर्शन केले.

 

आई वडिलांना मदत करीत दररोज अभ्यास करीत होती माझा पश्याचात आई, वडीलाबरोबर श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मधील सर्व शिक्षकांचे व माझा खाजगी क्लासेसच्या संचालिका सौ नागटिळक मॅडम यांचे मोठे योगदान आहे भविष्यात एम,बी,ए, करण्याचा माझा मानस असून उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शनाबरोबर मला आथींक मदतीची गरज आहे
कु, श्रावणी वेदपाठक विद्यार्थी नी केम तालुका करमाळा

हेही वाचा – हिरडगाव कारखाना थकीत ऊस बिलामुळे सुरू केलेले उपोषण श्रीगोंदा तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित; करमाळा परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे..

म्हणून फारूक जमादार यांचे करमाळा नगरपरिषदे विरुद्धचे उपोषण अखेर मागे; वाचा सविस्तर

आर्थिक मदतीचे आवाहन –

कु श्रावणी वेदपाठक हिला उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन व आथींक, मदतीसाठी कु, श्रावणी वेदपाठक हिचा मो नं7385087216संपर्क साधावा किंवा बापुराव पोपट वेदपाठक बॅक आॅफ महाराष्ट्र शाखा केम खाते क्रमांक. 20260543734
आय एफ सी कोड. M A H B ००००549 या अकाऊंटवर मदत पाटवावी असे आवाहन वेदपाठक यानी केले आहे

FacebookTwitterLinkedinWhatsappFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line