श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी व वाहनांचा होतोय निवडणुकीत गैरवापर; मकाईच्या ‘या’ माजी संचालकाने केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी व वाहनांचा होतोय निवडणुकीत गैरवापर; मकाईच्या ‘या’ माजी संचालकाने केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

करमाळा (प्रतिनिधी); मकाई सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे गेली 25 वर्षे सहज रित्या पार पडणाऱ्या या निवडणुकीत यावेळेस दमदार विरोधक निर्माण झाल्याने सध्या एकमेकांवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न निवडणुकीत सामील असलेल्या गटाकडून होत आहे.

मकाई कारखान्याचे कर्मचारी व वाहनांच्या गैरवापर बाबत मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष बापूराव शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोपे यांच्याकडे गुरुवारी दिनांक 8 रोजी तक्रारी अर्ज दिला आहे शिंदे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात पुढे असे म्हटले आहे की मकाई सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे.

परंतु कारखाना साइटवर पाहणी केली असता असे लक्षात येते की कारखान्याचे कर्मचारी व कारखान्याची वाहने ही माजी संचालकाच्या घरी कार्यालयामध्ये काम करताना दिसत आहे तसेच काही कर्मचारी कारखान्याचे कामकाज सोडून माजी संचालकाच्या प्रचाराचे काम करीत आहेत.

या तक्रारी अर्जात आणखीन शिंदे यांनी पुढे असे म्हटले आहे की कारखान्याचे वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या कार्यालयात जमा करावीत तसेच कर्मचाऱ्यांना कारखान्यावर दररोज हजेरी लावून कारखान्याचे कामकाज करण्यास सांगावे सदर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक स्वरूपात करावी व त्या कामी लागणारे बायोमेट्रिक मशीन स्वखर्चाने पुरवण्यास मी तयार आहे.

उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावर विविध निकष लावून अर्ज अवैध ठरवणारे निवडणूक निर्णय अधिकारी आता शिंदे यांच्या तक्रारीवरून कधी आणि काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

karmalamadhanews24: