आरोग्य करमाळा सोलापूर जिल्हा

जिजाऊ जयंती निमित्त कुंभेज येथे 102 जणांचे रक्तदान .

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिजाऊ जयंती निमित्त कुंभेज येथे 102 जणांचे रक्तदान .

केत्तूर ( अभय माने) कुभेज (ता.करमाळा) येथे शहीद जवान वीर पत्नी राणीताई काटे यांचे हस्ते व करमाळा तालुक्यातील माजी सैनीकांचे उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शिवस्फूर्ती समूह सोलापूर जिल्हा यांच्या वतीने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.शिबीरा दरम्यान 102 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सर्व धर्मीयांनी उत्साहाने रक्तदान केले.करमाळा येथील कमलाभवानी ब्लड बँकेने रक्त संकलनासाठी सहकार्य केले .

यावेळी पोफळज येथील श्वेता शिवाजी पवार व पल्लवी कुमार कादगे यांनी जिजाऊंची वेषभूषा साकारली.उपस्थितांनी जिजाऊ वंदना करून प्रीतमा पूजन केले आहे.ऋषीकेश भोसले याने शिव गारद दिली.

या प्रसंगी करमाळा तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे टी.व्ही.9 चे पत्रकार शितलकुमार मोटे यांचा सन्मान करण्यात आला.फुटबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक विजेता वेदांत आप्पासाहेब काटे याला सन्मानीत करण्यात आले.ग्रामीण पंजाब बँकेत निवड झाल्याबद्दल श्रीराम भोसले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

शिवस्फूर्ती समूहाचे वतीने सर्व उपस्थित मान्यवरां ना व रक्तदात्यांना जिजाऊंची शिकवण हा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला .

सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री अनिल कादगे यांच्या पुढाकारातून आणि कुंभेजसह तालुक्यातील तरुण मित्रपरिवाराच्या सहकार्याने हा विधायक उपक्रम प्रतिवर्षी नियमित सुरु आहे .

थोर व्यक्ती व समाज सुधारकांच्या स्मृती ह्या समाजहीताच्या विधायक उपक्रमांद्वारे जपायला हव्यात या उद्देशाने प्रतिवर्षी जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल कादगे यांनी सांगितले.

हेही वाचा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते, त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करणार: मंगेश चिवटे

जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी अमोल जगदाळे यांची निवड

यावेळी शिवस्फूर्तीचे अनिल कादगे, पठाडे ,सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रुर शिंदे,मेजर बिभिषण कन्हेरे सुरेश आदलिंग,सुभाष मुटके,भारत कादगे,सुनिल बापू सावंत, प्रविण भोसले,पक्षीमित्र कल्याणराव साळुंके,आदर्श शिक्षीका रेखा साळुंके,डॉ राजेंद्र शिंदे,म.पो.नि परमेश्वर कादगे ,गणेश शिंदे,अमोल मुटके सर,आण्णासाहेब भोसले,उपसरपंच संजय तोरमल, विनोद कादगे, कुमार कादगे, रवी काटे,ब्लड बँकेचे निलेश पाटील,भारत पवार, महावीर भोसले,संभाजी भोसले,किरण शिंदे,वैभव साळुंके,संतोष महाराज श्रीराम शिंदे सुदेश माने,आदि उपस्थित होते.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!