श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये गेस्ट लेक्चर चे आयोजन
माढा प्रतिनिधी – उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते.”कायदा व सुव्यवस्था तसेच ट्रॅफिकची नियमावली” याविषयी माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री नेताजी बंडगर साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
शिवाय माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री दराडे साहेब यांनीही कायद्याविषयी मार्गदर्शन केले.माढा पोलीस स्टेशनचे हवालदार श्री परमेश्वर जाधव यांनी कार्बाईन,एस.एल.आर,बाराबोर राईफल,गॅसगन या व इतर पोलीस शस्त्रांविषयी सविस्तर माहिती दिली.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वरील पोलीस शस्त्रे पाहण्यास मिळाली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब,माढा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री प्रणय शिंदे,श्री राहुल साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल श्री राहुल रिकिबे,उपळाईचे पोलीस पाटील श्री जावेद तांबोळी,विद्यालयाचे गुरुकुल विभागप्रमुख श्री शब्बीर तांबोळी सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते. श्री शब्बीर तांबोळी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.