तालुकास्तरीय धावणे क्रीडा स्पर्धेत नेरले शाळेच्या शुभम काळेचे वर्चस्व
करमाळा प्रतिनिधी – दि.१७/१२/२०२४ रोजी केम येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नेरले शाळेचा विद्यार्थी शुभम शिवाजी काळे याने १०० मीटर व २०० मीटर लहान गट मुले धावणे याने दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर शाळेची विद्यार्थिनी निकिता बाळासाहेब पोळ ही विद्यार्थिनी मोठा गट १०० मीटर धावणे या स्पर्धेत तालुका स्तरावर उपविजेती ठरली आहे.
हेही वाचा – अनिल झोळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.कसबे सर,श्री.मोरे सर,श्री.मनेरी सर,श्रीम आडेकर मॅडम,श्री.सय्यद सर,श्री.सूर्यवंशी सर व श्री. दिपक ओहोळ सर यांनी अभिनंदन केले.