विरोधी उमेदवार खोटे पण रेटून बोलत करताहेत जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल – आ.बबनराव शिंदे
अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ दारफळ सीना येथे सभा
माढा/प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड)
–आजतागायत मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हितासाठी वीज,जलसिंचन,रस्ते व ऊस गाळपाचे प्रश्न प्राधान्याने सोडविले.एकट्या दारफळ सीना व परिसरात विविध कामांसाठी 800 कोटींची विकासकामे केली आहेत. तालुक्यात टेंभुर्णी व कुर्डूवाडी येथे दोन एमआयडीसी सुरू केल्या असून मोडनिंब येथे तिसरीला शासनाची मंजुरी घेतली आहे.साखर कारखाने व इतर संस्थांच्या माध्यमातून हजारों बेरोजगारांना रोजगार दिला आहे.लवकरच बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नजिकच्या काळात खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे.सीना-भीमा नदीवर ठीकठिकाणी मोठे बॅरेजेस बांधले जाणार आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच शिवसेनेचे प्रा.शिवाजराव सावंत गट,पंढरपूर तालुक्यातील नेतेमंडळी,विठ्ठल व पांडुरंग परिवार,माजी सभापती शिवाजी कांबळे गट,रयत क्रांती संघटना,प्रहार शेतकरी संघटना, वडार माळी व मातंग समाजाने बिनशर्त अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे परंतु विरोधी उमेदवारांकडे विकासाची दृष्टी व व्हीजनचा अभाव आहे.ते विकासकामांवर बोलण्याऐवजी खोटे पण रेटून बोलत जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करीत असल्याचा सणसणीत टोला आमदार बबनराव शिंदे यांनी लगावला आहे.
ते दारफळ सीना ता.माढा येथे माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे प्रा.शिवाजी सावंत म्हणाले की,विरोधी उमेदवाराला पंढरपूर भागातील 42 गावांमध्ये कसलाही प्रतिसाद व थारा नाही.माढा तालुक्यातील दोन बलाढ्य शक्ति आमदार बबनराव शिंदे गट व सावंत गट एकत्र आल्याने रणजीत शिंदे यांचा विजय नक्की आहे.ही कटूसत्य लक्षात आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. ज्या लोकांना आम्ही दोघे एकत्र आलेले पाहवत नाही त्यांच्यावर निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. मतदारसंघात कसलाही विकास न करता दोन महिन्यात केवळ डिजिटलबाजी व मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवून आमदार होता येत नसते हे 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकालादिवशी स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी सांगितले की,जिल्ह्याचे नेते समजणाऱ्यांना करकंब व आलेगाव येथील साखर कारखाने नीट चालविता आले नाहीत त्यामुळे ते विकण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. विशेष बाब म्हणजे त्या दोन्ही ठिकाणचे साखर कारखाने अनुक्रमे आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत यांनी विकत घेऊन ते सध्या व्यवस्थितपणे चालवले जात आहेत.माळशिरस तालुक्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला जिल्ह्यात कधीच सर्वोच्च दर दिला नाही. वर्षांनुवर्षे राज्यात सत्तेत व मंत्रीपदावर असून त्यांना तालुक्यात साधी एक एमआयडीसी सुरू करता आली नाही हे वास्तव आहे.त्यांनी मागील वर्षी आपल्या दोन्ही कारखान्यातून अंतिम दर किती दिला ते सांगावे.चालू वर्षीच्या गळीत हंगामात ते पहिला हप्ता व अंतिम दर किती देणार आहेत हे जाहीर करुनच जिल्ह्यातील मतदारांना मते मागावीत असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.
हेही वाचा – राजकीय वातावरण तापले : राजकीय चर्चांना ऊत
पारंपारिक वाद्याला आले सुगीचे दिवस
यावेळी दूध संघाचे संचालक शंभुराजे मोरे,मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत,झुंजार भांगे, गणेश काशीद,हनुमंत पाडूळे, सज्जनराव जाधव,शिवसेनेचे मुन्ना साठे,नगरसेवक राजू गोटे,अरविंद खरात,सरपंच अशोक शिंदे,शिवाजी बारबोले, औदुंबर उबाळे,कुमार शिंदे, आनंद उबाळे,शहानवाज सय्यद,शिवाजी उबाळे,सुरेश शिंदे,रमेश चव्हाण,रमाकांत कुलकर्णी,विठ्ठल मुकणे,श्रीकांत कोरे,शिवाजी भोगे,सुभाष शिंदे, चंद्रकांत मुळे,भारत भांगे, स्वप्नील खरात,बालाजी बारबोले,विजय शिंदे,नाना बागल,राजेंद्र उबाळे,कुमार नवले,सर्जेराव सुळे,अशोक करळे,राजाभाऊ चव्हाण,उदय कदम,पिंटू नागटिळक,धर्मराज मुकणे,अजिंक्य काटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी- दारफळ सीना ता.माढा येथे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना आमदार बबनराव शिंदे बाजूला प्रा. शिवाजी सावंत समोर उपस्थित जनसमुदाय.