माढा राजकारण सोलापूर जिल्हा

माढा मतदारसंघातील जलसिंचन,वीज,रस्ते व ऊस गाळपाचे प्रश्न मार्गी लावले -आ. बबनराव शिंदे अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ दौरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा मतदारसंघातील जलसिंचन,वीज,रस्ते व ऊस गाळपाचे प्रश्न मार्गी लावले -आ. बबनराव शिंदे

अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ दौरा

माढा प्रतिनिधी –मतदारसंघातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त दर दिला.जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्या,वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले. अद्ययावत व व्यावसायिक शैक्षणिक सुविधेसाठी सीबीएसई बोर्डाचे स्कूल,डी व बी फार्मसी कॉलेजेस,कृषी महाविद्यालय, माध्यमिक विद्यालये व सिनिअर महाविद्यालय सुरू केले. आरोग्य सुविधांसाठी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली.पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह शासनाच्या विविध योजनांमधून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे.हा विकासाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना निवडून द्यावे.त्यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

ते माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ मानेगाव ता.माढा जिल्हा परिषद गटातील केवड, जामगाव,अंजनगाव उमाटे येथील प्रचार दौऱ्यात सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी बोलत होते.

पुढे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की, आजतागायत केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मी जनतेला मतदान करण्याचे आवाहन करीत आहे परंतु विरोधक मात्र खोटे बोलून व थापा मारुन जनतेची दिशाभूल करीत आहेत.मतदारसंघात टेंभुर्णी व कुर्डूवाडी येथे एमआयडीसी सुरू केल्या आहेत.तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून मोडनिंब येथील एमआयडीसीला मंजुरी घेतली असून भविष्यात ती कार्यान्वित होऊन अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी साखर कारखाने,माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक,जिल्हा दूध संघ,विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्यानेच मतदारसंघातील 80 टक्के क्षेत्र ओलीताखाली आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे म्हणाले की,विरोधी उमेदवाराकडे विकासाचा कसलाही अजेंडा व व्हिजन नाही.नुसत्या थापा मारून व शेतकऱ्यांची दिशाभूल करून गावोगावी वाढदिवस व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे डिजिटल बोर्ड लावून आमदार होता येत नसते.आमदार होण्यासाठी शेतकरी, सर्वसामान्य जनता व गोरगरिबांची कामे करावी लागतात हे कदाचित विरोधी उमेदवारला माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.वाळू उपसा करणाऱ्या मंडळींच्या हाती मतदारसंघ न देता विकासकामांचा डोंगर उभा करणाऱ्या आमदार बबनराव शिंदे यांच्या रणजीत शिंदे या कर्तृत्वावान मुलाला विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दूरदृष्टीने शाश्वत विकास केला – चेअरमन रणजितसिंह शिंदे मानेगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा

करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा दिग्गज साहित्यिकाच्या सोलापूर जिल्हा कार्यकार्रीणीत करमाळ्याचे पत्रकार दिनेश मडके यांची निवड

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडूळे, माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद, खरेदी विक्री संघाचे संचालक शिवाजी बारबोले, पंढरपूरचे मारुती जाधव यांच्यासह गावोगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,साखर कारखाने, जिल्हा दूध संघ,माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक,मार्केट कमिटी,खरेदी विक्री संघाचे आजी-माजी संचालक यांच्यासह शेतकरी,ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी- अंजनगाव उमाटे ता.माढा येथे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना आमदार बबनराव शिंदे बाजूला इतर मान्यवर व समोर उपस्थित जनसमुदाय.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!