करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात इलेक्शन फिव्हर चढला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात इलेक्शन फिव्हर चढला

केत्तूर (अभय माने) विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.मध्यंतरी झालेल्या शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फाटाफुटी नंतर या निवडणुका होत असल्याने या निवडणुका रंगतदार होणार असल्याने गावागावात चर्चांना ऊत आला आहे. वरिष्ठ पातळीवर तिकीट वाटप होत असल्याने राजकीय वारे जोरात वाहू लागले आहे.

गावागावातील,पारावर,चौका चौकात,हॉटेल,पानटपरी ,वर्तमानपत्र स्टॉल या ठिकाणी राजकीय फड रंगत आहेत. सोशल मीडिया फोडणी देण्याची काम करीत आहे.

जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. त्यामुळे कोण कुठे गेला ? कोणावर कोण नाराज आहे ? तिकीट कोणाला मिळणार ? पक्षाचे अधिकृत तिकीट ठरलेल्या व्यक्तीखेरीज नवीन व्यक्तीला मिळणार काय? अपक्ष कोण लढणार ? मतदार संघातून नवीन चेहरा मिळणार काय ? शेवटी मत कोणाला देणार ? कोण आपल्या भागाचा विकास करणार ?

हेही वाचा – कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांच्या मातोश्रींचे निधन

सोशल मीडियावरील चर्चा वादाचे कारण ठरत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने या ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.आपले पक्षावर,गटावर,किंवा नेत्यावर प्रेम आहे हे पटवून देण्यासाठी व्हाट्सअप कार्यकर्ते इरेला पेटले असल्याचे दिसत आहे.

आचारसंहिता … आचारसंहिता ….
सर्व शासकीय कार्यालयात कोणतीही काम घेऊन गेल्यास अधिकारी कर्मचारी आचारसंहिता … आचारसंहिता … सांगत असल्याने सर्वसामान्य जनता मात्र माघारी फिरत आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!