माढा राजकारण सोलापूर जिल्हा

कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे

वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

माढा /प्रतिनिधी- मागील 30 ते 35 वर्षापासून सातत्याने जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न मनापासून सोडविले आहेत. मतदारसंघात जलसिंचन,वीज, साखर कारखाने,रस्ते व विविध सामाजिक उपक्रमांसह केलेल्या विकासकामांमुळेच जनतेची क्रयशक्ती व राहणीमान उंचावले आहे ही वस्तुस्थिती असताना सध्या स्वतःला भावी आमदार म्हणून समजणारे काहीजण कोणत्याही प्रकारची विकासकामे न करता फक्त पैसा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या जोरावर आमदार होता येते असे समजत आहेत परंतु तो त्यांचा गैरसमज आहे.हे येत्या विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील सुज्ञ व जागरूक मतदार नक्कीच दाखवून देतील असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.ते वडाचीवाडी (अं.उ) ता.माढा येथे आयोजित कार्यकर्ता व शेतकरी मेळावा आणि वचनपूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते.

प्रास्ताविकात लोकप्रिय सरपंच रमेश भोईटे यांनी गावांमध्ये केलेल्या विविध विकासकामांची व भविष्यात करावयाच्या कामांची माहिती सांगितली.
यावेळी आमदार बबनराव शिंदे यांचा गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल सरपंच रमेश भोईटे व ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी फाउंडेशन टीमच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे म्हणाले की,आजपर्यंत या भागातील जनता व शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करून शाश्वत विकास केला आहे.बार्शी उपसासिंचन योजनेतून तालुक्यातील 4 गावांना पुढील रोटेशनला नक्कीच पाणी मिळणार आहे.सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील गावोगावचे तलाव,शेततळी व बंधारे भरले आहेत त्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मतदारसंघातील विरोधकांचा कारभार व त्यांची सर्व कुंडली जनतेला माहित आहे. आजपर्यंत जनतेने विकासालाच मतदान केले आहे.सरपंच रमेश भोईटे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे वडाचीवाडी हे गाव एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र बनल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.

 यावेळी जिल्ह्यातील एकमेव आमदार बबनदादा शिंदे ऑक्सिजन पार्क,गुळपोळी ते वडाचीवाडी डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण, सभामंडप,साठवण तलावातील पाण्याचे पूजन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते व चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 या कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की,जर मोठ्या साहेबांची तुतारी मिळाली तर ठीकच नाहीतर अपक्ष उमेदवार म्हणून माझा मुलगा रणजितसिंह शिंदे हे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. मतदारसंघातील विकासाचा रथ अविरत तेवत ठेवण्यासाठी माझ्यापेक्षाही जास्त मताधिक्य देण्यासाठी मतदार संघातील जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – श्री नंदिकेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सवाद्य मिरवणूक

मृत्यूनंतरही संपेनात हाल : उजनी पुनर्वशीत गावांची स्थिती

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल चव्हाण,कृषी पर्यवेक्षक अनिलकाका देशमुख,माढेश्वरी बँकेचे गणेश काशीद,खरेदी विक्री संघाचे संचालक शिवाजी बारबोले, मदन आलदर,सरपंच तानाजी लांडगे,सरपंच अशोक शिंदे, सरपंच राजेंद्र खोत,सरपंच रणजितसिंह पाटील, तात्यासाहेब भोईटे,मार्तंड जगताप,उपसरपंच आप्पासाहेब कोकरे,सुरवंताबाई गडदे,दिपाली जाधव,रंजना जगताप,विलास कौलगे,पंडित पाटील,कुमार शिंदे,तानाजी देशमुख,उल्हास राऊत,हनुमंत पाडूळे,रमेश उमाटे,शहानुर सय्यद,राजेंद्र गुंड,शिवाजी भोगे, रवींद्र चव्हाण,शरद नागटिळक, गणपत साठे,वैजिनाथ व्हळगळ,प्रविण लटके,तुकाराम कापसे,पिंटू नागटिळक,अमोल लटके, गोपीनाथ गवळी,जाफर पटेल,पोपट काशीद,सचिन क्षीरसागर,सुधीर टोणगे पांडुरंग कौलगे,राजेंद्र सोमासे,रमेश कदम,दादाराव गडदे,बिपिन कदम,गणेश भोईटे,अनिल क्षीरसागर, ग्रामसेवक संजय क्षीरसागर,ग्रामसेविका रेश्मा पाटील,विक्रम भोईटे,जयसिंग जगताप यांच्या ग्रामस्थ,शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन करून आभार पाणी फाउंडेशनचे प्रणेते मिटू जगताप यांनी मानले.

फोटो ओळी- वडाचीवाडी ता.माढा येथे ऑक्सिजन पार्क व विकासकामांचे लोकार्पण करताना आ.बबनराव शिंदे, उपसभापती सुहास पाटील, सरपंच रमेश भोईटे व इतर मान्यवर.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!