करमाळा सोलापूर जिल्हा

फौजीची वर्दी चिकाटीचे प्रतीक :गणेश करे पाटील यांचे गौरवोद्गार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

फौजीची वर्दी चिकाटीचे प्रतीक :गणेश करे पाटील यांचे गौरवोद्गार

केत्तूर ( अभय माने) कुंभेज (ता. करमाळा) येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात वाढदिवस अभिष्टचिंतन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोपळज येथील सेवानिवृत्त सुभेदार सचिन पवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले, फौजीच्या अंगावरील रुबाबदार दिसणाऱ्या वर्दीत,कष्ट,जिद्द,आणि चिकाटीचे प्रतीक असते.जात,धर्म,पंथाच्या पलीकडे जाऊन या वर्दीत सेवा असते तसेच देशसेवेचा स्वाभिमान असतो असे गौरवोद्गार करे यांनी काढले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करे म्हणाले की,समाजाच्या जडणघडणीत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते विद्यार्थी हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक आहे.उद्याच्या उज्वल समाज घडणीत त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे याकरिता मार्गदर्शनपर अनेक उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता व विकास यांच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो हे त्यांनी स्पष्ट केले.

ये वेळी सेवानिवृत्त सुभेदार सचिन पवार व गणेश करे पाटील यांची सवाद्य मिरवणूक काढून प्रशालेमध्ये प्रथम दिगंबरराव बागल व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.व दिप प्रज्वलित करण्यात आले.याप्रसंगी स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त भारतराव शिंदे शिंदे,महावीर साळुंखे,बाळकृष्ण लावंड,अनिल कादगे,बिभीषण कन्हेरे र पोलीस उपनिरीक्षक (निर्भया पथक) वाघमारे,पत्रकार गजेंद्र पोळ,राजाराम माने,नंदकिशोर वलटे,प्रशांत नाईकनवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – श्री किर्तेश्वर देवस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त भव्य किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

यावेळी गणेश करे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.सुभेदार सचिन पवार यांनी आपल्या 22 वर्षाच्या कार्यकाळातील चित्तथरारक अनुभव सांगितले.याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

येवेळी प्रसारित गुणवंत विद्यार्थी तृप्ती सातव,पल्लवी कादगे, समृद्धी शिंदे,यांचा यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानपत्र,मेडल,रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले.व प्रशालेसाठी तीन एलईडी टीव्हीसंच देण्यात येणार असून यावेळी एक संच देण्यात आला.

कार्यक्रमाचे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणराव साळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन विष्णु शिंदे यांनी केले. शेवटी आभार मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी मांनले.

छायाचित्र: कुंभेज (ता. करमाळा) सुभेदार सचिन पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान करताना स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त भारतराव शिंदे व मान्यवर
(छायाचित्र -शुभम देडगे)

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!