करमाळा येथे स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न; क्लिक करून वाचा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे!
केत्तूर (अभय माने) शालेय जीवनात मातृभाषेबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात विविध संधी निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे यांनी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषीक वितरण प्रसंगी केले.
इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार प्रा.गणेश करे- पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व आर्थिक सौजन्याने यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, पं.समिती शिक्षण विभाग व करमाळा तालुका इंग्लीश टीचर्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील 5 वी ते 10 वी च्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी तीन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.सदर स्पर्धेसाठी बार्शी तालुक्यातून परीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणविस्तार अधिकारी नितीन कदम, सोलापूर जिल्हा इंग्रजी असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, सचिव धनाजी राऊत,बार्शी पं.स.विषयतज्ञ श्रीमती लक्ष्मी तोरड, करमाळा तालुका इंग्रजी असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके,सचिव गोपाळराव तकीक, पं.स.विषयतज्ञ रेवन्नाथ आदलिंग, मुख्याध्यापक नीळ सर ,उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात नलवडे म्हणाले की,जागतिकीकरण व तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात प्रगतीच्या वेगाशी जुळवून घेत स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी इंग्रजी भाषा महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी लोकशिक्षीका स्व.लिलाताई दिवेकर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे.यशकल्याणी सेवाभावी संस्था व करमाळा तालुका इंग्लीश टीचर्स असोसिएशनला शैक्षणिक बाबतीत पं.स.शिक्षण विभाग नेहमीच सहकार्य करीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळकृष्ण लावंड,सुखदेव गिलबीले यांनी केले तर आभार सहसचिव मारूती जाधव यांनी मानले.
स्पर्धेतील विजेते वक्ते व शाळा
गट – पाचवी /सहावी
प्रथम क्रमांक –
स्वरा प्रवीण कुलकर्णी –
साडे हायस्कूल साडे,
द्वितीय क्रमांक
तेजस्वी सुरेश गव्हाणे
रा .बा. सुराणा हाय चिखलठाण, तृतीय क्रमांक -पारस नवनाथ भंडारे जि प शाळा खंडागळेवस्ती,
चतुर्थ क्रमांक – राजवीर अजिनाथ घाडगे,गुरुकुल पब्लिक स्कूल देवीचामाळ,
पाचवा क्रमांक -शिवन्या संदीप ढेरे, छ . शिवाजी हायस्कूल वीट .
गट-सातवी /आठवी
प्रथम क्रमांक –
सान्वी अतुल पोळ, क .अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा,
द्वितीय क्रमांक –
वैभव अरुण कोकरे, त्रिमूर्ती विद्यालय टाकळी
तृतीय क्रमांक -संध्याराणी श्रीकृष्ण लबडे
न्यू ईरा पब्लिक स्कूल चिखलठाण,
चतुर्थ क्रमांक -रझान शब्बीर आतार
क .अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा,
पाचवा क्रमांक -वरद जयंत देशमुख
गुरुकुल पब्लिक स्कूल देवीचामाळ,
उत्तेजनार्थ -अनन्या दत्तप्रसाद मंजरतकर
भारत हायस्कूल जेऊर
कटला जातीचे दोन मासे देऊन केला मच्छीमार बांधवांनी आमदार भरणे यांचा केला आगळावेगळा सत्कार
गट – नववी / दहावी
प्रथम क्रमांक -अपूर्वा जनार्दन पवार,
गिरधरदास देवी विद्यालय करमाळा.
द्वितीय क्रमांक -प्रगती किशोर चव्हाण,साडे हायस्कूल साडे.
तृतीय क्रमांक -प्रांजली बाळकृष्ण लावंड
म. गांधी विद्यालय करमाळा.
चतुर्थ क्रमांक -आरती अरुण कोकरे,त्रिमूर्ती विद्यालय टाकळी.
पाचवा क्रमांक -आलिशा अस्लम शेख,श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा.
उतेजनार्थ -गिरिजा बाळकृष्ण टेके,श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी.
सर्व सहभागी विद्यार्थी व विजयी स्पर्धकांचे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी अभिनंदन केले.