एकादशीला रताळी झाली महाग सर्वसामान्यांना चव दुर्मिळ
केत्तूर (अभय माने)आषाढी एकादशी निमित्त बहुतांश लोक उपवास करीत असतात त्यामुळे या काळात उपवासासाठी लागणाऱ्या रताळयांना जास्त मागणी असते. आषाढी एकादशीनिमित्त केत्तूर सह परिसरात रताळ्याची आवकच झाली नसल्याने भाविकांची मोठी अडचण झाली होती.
पाण्याच्या कमतरतेमुळे यावर्षी रताळ्याची लागवड कमी प्रमाणात झाली होती तर नेहमीच्या तुलनेत उत्पादनही कमी निघाले. पर्यायाने आवकच कमी झाल्याने शहरी भागातही किरकोळ बाजारात 100 रुपये किलो या दराने रताळ्याची विक्री होत होती. गेल्यावर्षी हेच दर 25 ते 30 रुपये किलो असे होते.
अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ
गावरान रताळी आकाराने लहान असतात त्यांची चवही गोड असते त्यामुळे या रताळ्यांना मोठी मागणी असते, तर कर्नाटक रताळी आकाराने मोठी व चवीला तुरट असल्याने त्यांना तुलनेने मागणी कमी असते.
” दरवर्षी रताळ्याची पीक घेत असतो यावर्षी पाण्याची कमतरता असूनही उत्पादन घेतले परंतु, तुलनेने उत्पादन कमी म्हणजे निम्मेही झाले नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी पुणे मार्केटला 60 रुपये दराने ठोक विक्री केली.आवक कमी झाल्याने मिळणारा दर समाधानकारक मिळाला.
-संतोष कांबळे, उंदरगाव (ता.करमाळा)