केत्तूर येथील नेताजीच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद
केतूर (अभय माने) शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथा सहशालेय उपक्रमांतर्गत’ सहल ‘ उपक्रमामुळे प्रत्यक्ष अध्ययन व अनुभव देता येतात तसेच सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात असे मत विशाल जाधवर यांनी व्यक्त केले.
नुकतीच नेताजी सुभाष विद्यालय, केत्तूर नं.2 (ता.करमाळा) येथील दोन मुक्काम व तीन दिवसीय शैक्षणिक सहल पार पडली. करमाळा आगाराच्या पाच एसटी बसमधून 207 विद्यार्थी-विद्यार्थिनी व 22 शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी सहलीस गेले होते.
या सहलीत शिखर शिंगणापूर-औंध-ज्योतीबा-गगनबावडा-विजयदुर्ग-देवगड- कुणकेश्वर-सिंधुदुर्ग किल्ला अशा अनेक ऐतिहासिक,भौगोलिक स्थळांना भेटी दिल्या.सदर सहलीचे काटेकोर नियोजन प्राचार्य दिलावर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभागप्रमुख भिमराव बुरूटे यांनी केले.सर्वांच्या सहकार्याने सहल यशस्विरित्या पार पडली.
आदिनाथ कारखान्यातील बेकायदेशीर भंगार मालाची विक्री निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.
यावेळी एखाद्या ठिकाणची ऐतिहासिक तसेच भौगोलिक माहिती मिळविण्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मोलाची मदत केली. विद्यार्थ्यांनी यावेळी सहभोजनाचा आनंदही लुटला.शैक्षणिक व नैसर्गिक बाबींचा समतोल साधत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
“विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी व बाहेर जगामध्ये खऱ्या ज्ञानाची सहलीमुळे चांगली मदत झाली.
– रणजित कोकणे, विद्यार्थी
Add Comment