महाराष्ट्र शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

आनंदाची बातमी! उजनीने ओलांडला ३२ टक्क्यांचा टप्पा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आनंदाची बातमी! उजनीने ओलांडला ३२ टक्क्यांचा टप्पा

सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आता ३१ टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतेक धरणे हाऊसफुल्ल भरल्याने दौंडवरून २० हजारांहून अधिक क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे.
पावसाळा सुरु होऊन जून, जुलै, ऑगस्ट महिना संपला, तरीपण उजनी धरण २५ टक्क्यांपर्यंतच भरले. आता परतीच्या पावसाने उजनी आता ३२ टक्क्यांवर पोचले आहे. मागील पाच दिवसांत धरणात ५ टीएमसी पेक्षा अधिक पाणी आले आहे.

सोलापूर, पंढरपूर शहरासाठी उजनीतून पाणी सोडले, पण दिलासादायक स्थिती म्हणजे तेवढेच पाणी धरणात आता जमा झाले आहे. आता पुणे जिल्ह्यातील बहुतेक धरणे भरल्याने उजनीतील विसर्ग आणखी वाढेल, असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्याच्या शेवटी धरण परिसरात व पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्याने काही दिवसांत उजनी ५० टक्क्यांवर जाईल, अशी स्थिती आहे. आता खडकवासला धरणातूनही खाली पाणी सोडले जात आहे.

धरणात ८१ टीएमसी एकूण पाणीसाठा उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा ८१ टीएमसी आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 17.20 टीएमसीपर्यंत आहे. पुणे जिल्ह्यातून दौंडमार्गे मोठा विसर्ग धरणात येत असून धरण परिसरात देखील पाऊस पडत आहे. त्यामुळे उजनी धरण काही दिवसांत ५० टक्के भरेल, अशी सद्य:स्थिती आहे. मागील 8 दिवसांत धरणात 13 टक्के पाणी आले आहे. अद्याप दौंडवरुन विसर्ग सुरूच असल्याने पुढील आठ दिवसात धरण 50 टक्के भरेल.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!