महाराष्ट्र शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

अजित पवार म्हणाले “उजनीत ढगफुटीसारखा पाऊस पडला पाहिजे, पण …” 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अजित पवार म्हणाले “उजनीत ढगफुटीसारखा पाऊस पडला पाहिजे, पण …” 

,

बारामती: राज्यात यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वजणच चिंतेत आहेत. राज्यातील प्रमुख धरणंही यंदा भरली नाहीत, त्यामध्ये पुरेसा पाणीसाठाही साचला नाही. त्यामुळे अजित पवारांनी देवाला साकडं घातलं आहे. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, सर्वांना सुख समृद्धी लाभू दे असं म्हटलं. तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, उजनीत ढगफुटीसारखा पाऊस पडू दे, पण फक्त शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर बारामतीतील गणेश मंडळांना भेटी सुरू आहेत. त्यादरम्यान त्यांनी राज्यात भरपूर पाऊस पडू दे सर्वांना सुख समृद्धी लाभू दे, शेतकरी समाधानी होऊ दे असं साकडं गणरायाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातलं. 

उजनी धरण फक्त 25 टक्के भरलं आहे. उजनीत ढगफुटी सारखा पाऊस पडला पाहिजे, फक्त कुठं नुकसान होऊ नये असं साकड अजित पवारांनी घातलं आहे. 

सोलापूर , पंढरपूर , सांगोला आणि मंगळवेढा या शहरांसह जवळपास 125 खेडेगावांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी शनिवारी पंढरपूरच्या वेशीवर असणाऱ्या गुरसाळे बंधाऱ्यात पोचले आहे. सुरुवातीला थोडे संथ गतीने सुरु झालेला प्रवास अखेरच्या टप्प्यात थोडा वेगवान झाल्याचे चित्र आहे . मात्र उजनी पासून निघाल्यावर सात बंधारे भरत आज सायंकाळी पंढरपूरच्या अलीकडे असणाऱ्या गुरसाळे बंधाऱ्यात पोचले आहे. उजनी धरणापासून गुरसाळे बंधाऱ्याचे अंतर 108 किलोमीटर असून हा बंधारा भरल्यानंतर हे पाणी पुढे उद्या पहाटे पर्यंत पंढरपूर बंधाऱ्यात पोचणार आहे. 

पंढरपूर बंधारा भरल्यावर चंद्रभागेतून मंगळवेढा मार्गे या पाण्याचा प्रवास सोलापूर कडे सुरु होणार आहे. आज सायंकाळी गुरसाळे बंधाऱ्यात पोचलेल्या पाण्याने हा बंधारा पूर्णपणे भरण्यास जवळपास 4 ते 5 तसंच अवधी लागणार आहे. उद्या पंढरपूर शहर, सांगोला शहर, 81 गावाची शिरवावी पाणीपुरवठा योजना आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणी पुरवठा योजनेस पाणी पुरवठा करणाऱ्या चंद्रभागा बंधाऱ्यात पाणी पोचल्यावर पुढील दोन महिने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!