करमाळा

व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर 

पुणे(प्रतिनिधी); महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र तसेच जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक जगदीश ओहोळ यांना नुकताच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बी पँथर व औरंगाबादकरांच्या वतीने हा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त आरटीओ अधिकारी अनिल कुमार बसते साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

यावेळी समता सैनिक दलाचे मनोज गरबडे, भिमशक्तीचे सुभाष गायकवाड, सागर पगारे, सर्पमित्र आकाश जाधव, श्रावण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जगदीश ओहोळ यांची सबंध महाराष्ट्र वर शिव फुले शाहू आंबेडकर व सर्व महामानवां विषयी व्याख्याने होत असतात. तसेच अनेक शाळा महाविद्यालयांमधून त्यांची मोटिवेशनल व्याख्याने होत असतात. त्यांचे आजवर दोन पुस्तकं प्रकाशित झाले असून ही पुस्तके सर्वत्र लोकप्रिय ठरलेली आहेत. तसेच त्यांनी जगदीशब्द फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ बालकांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. 

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना जगदीश ओहोळ म्हणाले की, समाजाविषयी तळमळीने काम करत असताना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महामानवांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व महामानवांचे खरे विचार हे समाज तोडणारे नव्हे तर समाजाला जोडणारे आहेत त्यामुळे आजच्या पिढीपर्यंत शिव, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पोहोचणे गरजेचे आहे. तसेच समाजातील ज्या वर्गाला आजही मूलभूत सुविधा मिळाला नाहीत शिक्षण मिळाले नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचे द्वारे खुले होण्यासाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. औरंगाबादकरांनी हा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. खरं तर हा पुरस्कार म्हणजे पुढील कामासाठी बळ आणि केलेल्या कामाची पोचपावती आहे असे मत जगदीश ओहोळ यांनी व्यक्त केले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!